घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंकडून खेळी! अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

उद्धव ठाकरेंकडून खेळी! अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सेनेकडून उमेदवारी जाहीर

Subscribe

मुंबई – शिवसेनेत बंडाळी झाल्यापासून राज्याच्या राजकारणात नियमित संघर्ष पाहायला मिळत आहे. पक्ष आणि धनुष्य बाणावर शिंदे गटाने दावा केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना ठाकरे गटाने शिंदेना मोठा धक्का दिला आहे. अंधेरी पूर्वेत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे.

हेही वाचा – मोदी भाबडे, निरागस, निष्पाप; शिवसेनेची पंतप्रधानांवर उपहासात्मक टीका

- Advertisement -

अंधेरी पूर्वमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने त्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. त्यामुळे शिंदे गटाने कोणतीही खेळी करण्याआधी ठाकरेंनी तिथे उमेदवार जाहीर केला आहे. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.

हेही वाचा – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर नितेश राणे यांच्या गाडीचा अपघात

- Advertisement -

दरम्यान, अंधेरी पूर्वमधून भाजपकडून उमेदवारी जाहीर होऊ शकते. या उमेदवाराला शिंदे गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ऋतुजा लटके यांनी काल, सोमवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे या जागेवर केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते. सेनेत बंडखोरी झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -