घरमहाराष्ट्रशिर्डीत नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात सापडला मृतदेह!

शिर्डीत नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात सापडला मृतदेह!

Subscribe

या खुनाचा १२ तासात उलगडा करण्यात पोलिसांना आले यश

शिर्डी बस स्थानकासमोरील नगरपंचायतीच्या सार्वजनिक शौचालयात शनिवारी एका अज्ञात व्यक्तीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

खुनाचा १२ तासात उलगडा

मिळालेल्या माहितीनुसार, डोक्यात, पायावर सिमेंटचे ब्लॉक आणि कोणत्या तरी हत्याराने हल्ला करुन या व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसंच त्याचा चेहऱ्यावरही वार केले होते. या खुनाचा १२ तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आहे. मृताजवळील पैसे हिसकावताना त्याने विरोध केल्याने तिघांनी त्याची हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झाले आहे.

- Advertisement -

मोजक्या पैशांसाठी निर्घृण हत्या

शंकर उर्फ अन्ना असे मृताचे नाव असून गेल्या दोन वर्षापासून शिर्डीत शंकर राहत होता. हा व्यक्ती कधी भीक मागून तर कधी मोल मजुरी करत आपली भूक भागवायचा. आरोपींना त्याच्याकडे पैसे असण्याच्या संशयावरून १२ जूनच्या रात्री आठ ते दहाच्या सुमारास तिघं आरोपींनी त्याकडील मोजक्या पैशांसाठी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर त्याची ओळख लक्षात येऊ नये, म्हणून आरोपींनी त्यांच्या अंगावरील कपडे काढत चेहऱ्यावर वार केले.

आरोपींना चौकशीसाठी घेतले ताब्यात

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने पाठलाग करुन वयवर्ष ३० असणाऱ्या राजेंद्र गोविंद गवळी २१ वर्षीय सुनील महादेव कांबळे आणि ३० वर्षीय सुनील शिवाजी जाधव यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हे तिन्ही आरोपी हे वेगवेगळ्यात जिल्ह्यातून शिर्डीत असून ते इथेच मोलमजुरी करत होते. तसेच ते साईबाबा मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची अधिक माहिती एबीपी माझाने दिली आहे.


बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -