घरताज्या घडामोडीसुशांत सिंह राजपूत यांचे नातेवाईक मुंबईत दाखल; कूपर रुग्णालयाबाहेर गर्दी

सुशांत सिंह राजपूत यांचे नातेवाईक मुंबईत दाखल; कूपर रुग्णालयाबाहेर गर्दी

Subscribe

सुशांत सिंहचे कुटुंबीय त्याचे शव पटना येथील घरी आणणार होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना परवानगी मिळाली नाही.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने डिप्रेशनमध्ये येऊन रविवारी आत्महत्या केली. सुशांत सिंहच्या पार्थिवाला आज विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्याचे अंत्यसंस्कार होणार आहे. सुशांत सिंह यांचे वडील, बहीण आणि नातेवाईक मुंबई दाखल झाले आहेत. सुशांत सिंहचे कुटुंबीय त्याचे शव पटना येथील घरी आणणार होते. पण लॉकडाऊनमुळे त्यांना परवानगी मिळाली नाही. तसेच कूपर रूग्णालयात सुशांतचे शवविच्छेदन करण्यात आले असून बाहेर आपल्या लाडक्या अभिनेत्याला शेवटचे पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

सुशांत सिंह यांचे शव कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले आहे. तसेच चार वाजता त्यांचे अंत्यसंस्कार केले जाणार आहे. सुशांत सिंहच्या बहिणीच्या नवऱ्याने ओपी सिंह याने कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय सुशांतची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. तर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालानुसार, त्याचा मृत्यू लटकल्यामुळे झाला आहे. फाशी लावण्यासाठी कपड्याचा उपयोग करण्यात आला होता. तसेच शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आल्या नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -