घरताज्या घडामोडीDeglur By Election: देगलूर पोटनिवडणूकीत ६०.९२ टक्के मतदान, दीड लाखांहून अधिक मतदारांनी...

Deglur By Election: देगलूर पोटनिवडणूकीत ६०.९२ टक्के मतदान, दीड लाखांहून अधिक मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

Subscribe

देगलूर बिलोली मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.९२ टक्के मतदान झाले आहे. भाजपकडून सुभाष साबणे तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण १ लाख ८१ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराषट्रासह देशात एकूण ३० विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. तर तीन लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात विधानसभेच्या एका जागेवर निवडणूक घेण्यात येत आली. ही पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची ठरली.

देगलूर बिलोली मतदारसंघात एकूण ६०.९२ टक्के मतदान झाले. या दरम्यान ९४२२७ पुरुष मतदार तर ८७५२३ स्त्री मतदार यांनी मतदान केले असे एकूण १लाख ८१ हजार ७५० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १ वाजेपर्यंत ३१ टक्के मतदान झालं होते. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४८.४७ टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. नांदेडमधील देगलूर बिलोली येथील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे विधानसभेची जागा रिक्त होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर कऱण्यात आली होती. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये या निवडणुकीवरुन चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरु होते. सकाळी ७ ते ९ या कालावधीत १२ टक्के मतदान पूर्ण झाले होते. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.

- Advertisement -

काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवर महाविकास आघाडीकडून अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली आहे. या भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी स्वतः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तळ ठोकून होते तर केंद्रीय मंत्रीही प्रचारासाठी मैदानात उतरले होते. तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते प्रचारासाठी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा : सातारा जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंची जिरवण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांना राजे म्हणतात…


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -