घरताज्या घडामोडीसातारा जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंची जिरवण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांना राजे म्हणतात...

सातारा जिल्हा बँक निवडणूक : उदयनराजेंची जिरवण्यासाठी फिल्डिंग लावणाऱ्यांना राजे म्हणतात…

Subscribe

सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी साताऱ्यातील दोन्ही राजे आमने-सामने आले असून त्यांच्यातील संघर्ष सुरु झाला आहे. यामध्ये आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ईडीची नोटीस आली आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा समावेश करण्यात आला नाही यामुळे देखील उदयनराजे संतप्त झाले आहेत. बँकेला ईडीची नोटीस का आली असा प्रश्न केला यावर बँकेकडून प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नाही असे सांगण्यात आले आहे. यावर उदयनराजेंनी संताप व्यक्त करत ही बँक गरीब शेतकऱ्यांची आहे. त्यांची कोणीही जिरवू नका असे म्हटलं आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला आलेल्या ईडी नोटीसबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे यांनी म्हटलं आहे की,अनेकांना वाटत असेल मला मस्ती आली आहे. मात्र मेहरबानी करुन माझी कोणी जिरवू नका मी कोणाचाही दुश्मन नाही आहे. गरीब शेतकऱ्यांची ही बँक आहे. त्यांची जिरवू नका, सातारा जिल्हा बँकेचा सदस्य आणि जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा बँकला प्रश्न केला होता असे उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं आणि कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. जे व्हायचे आहे ते होऊद्या असे वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

- Advertisement -

शेतकरी सभासदांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की ही बँक राहू द्या, ही बँक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण अर्थवाहिनी आहे. सभासदांची जिरवू नका माझी कोणी जिरवायची तर जिरवा अस उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. माझी जिरवण्यसाठी फिल्डिंग लावण्यात आली असल्याचे उदयनराजे यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी उदयनराजेंनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दरम्यान उदयनराजे यांना पॅनलमधून वगळण्यात आल्यामुळे दोन्ही राजेंमध्ये संघर्ष सुरु झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :Deglur By Election: देगलूर- बिलोली मतदारसंघात दुपारपर्यंत ३१ टक्के मतदान, वाचा आतापर्यंतचे अपडेट


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -