घरताज्या घडामोडीया सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर - फडणवीस

या सरकारला विदर्भ, मराठवाड्याचा विसर – फडणवीस

Subscribe

महाविकास आघाडी सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, अशी जहरी टीका फडणवीसांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाखाली अर्थमंत्री अजित पवारांनी केवळ जाहीर सभेतले भाषण केले. अर्थमंत्र्यांच्या भाषणात आर्थिक स्थितीचे विश्लेषण नव्हते, असे फडणवीस म्हणाले.


हेही वाचा – महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२०: वाचा कशासाठी काय मिळालं?

या सरकारला विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा विसर पडला आहे. “मराठवाडा वॉटर ग्रीड हा २० हजार कोटींचा प्रकल्प आहे. परंतू या प्रकल्पाला फक्त २०० कोटी देण्यात आले आहेत. कोकणातील वाहून जाणारे १६८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडयाला दुष्काळ मुक्त करण्याची योजना ही आमची होती. पण त्याचा साधा उल्लेखही या सरकारने अर्थसंकल्पात केलेला नाही,” अशी टीका फडणवीस यांनी केली. केंद्र सरकारवर टीका करुनच या सरकारने नकारात्मक सुरुवात केली. या सरकारला सत्तेचे दिलेले वचन लक्षात आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा यांना विसर पडला आहे. या सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी टीका फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -