घरमहाराष्ट्रआंबाबाईची भंगलेली मूर्ती बदला; भक्तांची मागणी

आंबाबाईची भंगलेली मूर्ती बदला; भक्तांची मागणी

Subscribe

अंबाबाबाईच्या मूर्तीचे १९१७ सालापासून आजपर्यंतचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी भंगल्याचे फोटो उपलब्ध आहेत.

करवीर निवासनी श्री आंबाबाईची मूर्ती पाच ठिकाणी भंगली आहे. इतकंच नाही कोल्हापूरच्या आंबाबाईला गेल्या १२ वर्षांपासून मस्ताकाभिषेक घालण्यात आला नसल्यामुळे, लवकरात लवकर ही मूर्ती बदलावी अशी मागणी भक्तांनी केली आहे. या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदनही देण्यात आलं आहे. धर्मशास्त्रानुसार भंगलेली मूर्ती पूजेत ठेवणं गैर असून, ही मूर्ती त्वरित बदलली जावी आणि त्याठिकाणी नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशी मागणी आंबाबाईच्या भाविकांनी केली आहे. अंबाबाबाईच्या मूर्तीचे १९१७ सालापासून आजपर्यंतचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी भंगल्याचे फोटो उपलब्ध आहेत. जवळपास गेल्या शतकाभरात या मूर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज झाली असल्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाची खात्री देता येत नाही असे पुरातत्त्व खात्याने म्हटले होते. ज्यावेळी २०१६ मध्ये या मूर्तीचं संवर्धन करण्यात आलं होतं, त्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे वक्तव्यं केलं होतं. दरम्यान, आता ही भंगलेली मूर्ती बदलण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.


वाचा: राज ठाकरेंना गांभीर्याने घेऊ नका – मुख्यमंत्री

उपलब्ध माहितीनुसार, माजी जिल्हाधिकाऱ्यांनी या भंगलेल्या मूर्तीचे चित्रीकरण पाहिले होते. मात्र, अद्याप हे चित्रीकरण भक्तांसमोर आणले गेलेले नाही. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या मूळ मूर्तीची नित्य पूजा झाली पाहिजे. या पूजेमध्ये स्नान, अभिषेक, देवीची आरती आणि मंत्रपठणासारख्य भागांचा समावेश होतो. असं म्हणतात की कोल्हापूरच्या अंबाबाईचे देवस्थान हे जागृत आहे. त्यामुळे ते जागृत ठेवण्यासाठी या सगळ्या प्रक्रिया होणं नित्याचं आहे. मग असं असतानाही गेल्या १२ वर्षांपासून मूर्तीला अभिषेक का घालण्यात आलेला नाही? असा सवाल भक्तांनी केला आहे. ही मूर्ती अभिषेकापासून वंचित राहिली आहे, याची कल्पना पूजारी आणि प्रशासन यांना आहे तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचाही थेट आरोपही आंबाबाईच्या भक्तांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -