घरक्रीडाWorld Tour Finals Badminton : सिंधूचा सलग दुसरा विजय

World Tour Finals Badminton : सिंधूचा सलग दुसरा विजय

Subscribe

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झु यिंगचा पराभव केला.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ताई झु यिंगचा पराभव करत वर्ल्ड टूर फायनल्समध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे. सिंधूने यिंगचा १४-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. हा तिचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे. याआधी स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या अकाने यामागूचीचा २४-२२, २१-१५ असा पराभव केला होता. या दोन विजयांमुळे सिंधू वर्ल्ड टूर फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पहिला सेट गमावूनही सामन्यात विजयी

या सामन्याची सुरुवात सिंधूसाठी चांगली झाली नाही. त्यामुळे पहिल्या सेटच्या मध्यंतराला ती ११-७ अशी मागे पडली. यानंतर तिने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ती अपयशी ठरली. त्यामुळे तिने हा पहिला सेट १४-२१ असा गमावला. पण दुसऱ्या सेटमध्ये तिने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे तिने दुसऱ्या सेटच्या मध्यंतराला ११-६ अशी आघाडी मिळवली. तर पुढेही तिने आपला चांगला खेळ सुरु ठेवत हा सेट २१-१६ असा जिंकला. तर तिसरा सेट अधिकच चुरशीचा झाला. मध्यंतरापर्यंत सिंधूला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे ती मध्यंतराला ११-६ अशी मागे पडली होती. पण यानंतर तिने आपला खेळ उंचावत हा सेट २१-१८ असा जिंकत सामनाही जिंकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -