घरताज्या घडामोडीहृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाटांवर अँजियोप्लास्टी

हृदयविकाराच्या झटक्यानंतर संजय शिरसाटांवर अँजियोप्लास्टी

Subscribe

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांच्यावर मुंबईत एन्जोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आहे. संजय शिरसाट यांच्यावर शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आली आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे औरंगाबादचे आमदार संजय सिरसाट यांच्यावर मुंबईत एन्जोप्लास्टी करण्यात आल्याची माहिती समोर आहे. संजय शिरसाट यांच्यावर शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आली आहे. संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. (Balasahebanchi shivsena mla sanjay shirsat angioplasty done at lilavati hospital in mumbai)

मिळालेल्या माहितीनुसार, हृदय विकाराचा सौम्य झटका आल्यानंतर सोमवारी रात्री संजय शिरसाट यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्यावरील अधिकच्या उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला आणण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय शिरसाट यांच्या तब्येतीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला.

- Advertisement -

आमदार संजय शिरसाठ यांच्यावरील अधिकच्या उपचारांकरीता मुंबईला आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरू केल्या. मुंबईमध्ये आल्यानंतर संजय शिरसाट यांना ताबडतोब लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर एन्जोप्लास्टी करण्यात आली आहे. संजय शिरसाट यांच्यावर शस्त्रक्रिया करून एक स्टेन टाकण्यात आली आहे.

सद्यस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सिग्मा हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी वारंवार संपर्क करून शिरसाट यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या 40 हून अधिक बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. संजय शिरसाट यांनीही ही नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली, या नाराजीमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.

संजय शिरसाट हे शिवसेनेतून निवडणून आलेले आमदार आहेत. मात्र ते आता शिंदे गटात सामील झाले आहेत. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते विधानसभेवर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.


हेही वाचा – रेशनवर दिवाळी किट मिळणार 20 ऑक्टोबरनंतर, मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -