घरमहाराष्ट्रनाशिकरामनवमी सोहळ्याच्या निमित्ताने साई बाबा चरणी 'इतक्या' कोटींचे दान

रामनवमी सोहळ्याच्या निमित्ताने साई बाबा चरणी ‘इतक्या’ कोटींचे दान

Subscribe

नाशिक : शिर्डी हे देशासह जगभरातील भाविकांचं मोठे श्रद्धास्थान आहे तसेच साईबाबांची शिर्डी संस्थान हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत देवस्थान देखील मानलं आहे. साईबाबांच्या काळातच आजपासून 112 वर्षांपूर्वी श्री राम नवमी निमित्त मोठा सोहळा पार पडतो. मागची दोन वर्ष कोरोना निर्बंध त्याच सोबत मंदिरे बंद असल्यामुळे अनेक भाविकांना साईबाबांचा दर्शन घेता आलं नव्हतं. मात्र, यंदाच्या वर्षी निर्बंधाशिवाय लाखो भाविकांनी साईबाबांचा दर्शन घेतलं. महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा आंध्र या भागातून मोठ्या प्रमाणात पालख्या रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये दाखल होत असतात.

यंदाच्या वर्षी साईबाबांच्या दानपेटीत मोठ्या प्रमाणात भक्तांनी दान अर्पण केलं आहे यामध्ये दानपेटीच्या माध्यमातून तब्बल एक कोटी 81 लाख 82 हजार रुपये तर काउंटर द्वारे 76 लाख 18 हजारांचा तसेच ऑनलाईन देणगी स्वरूपात एक कोटी 41 लाख 52 हजार रुपयांचा दान प्राप्त झाला आहे.

- Advertisement -

रोख रुपयांसोबतच साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात सोनं चांदी या स्वरूपात सुद्धा दान अर्पण केलं जातं. रामनवमीच्या तीन दिवसांमध्ये तब्बल 171 ग्राम सोने याची किंमत आठ लाख 64 हजार इतकी आहे तर 2713g चांदी ज्याची किंमत एक लाख 21 हजार इतके आहे याचाही दान साईबाबांच्या चरणी झाला आहे.

या तीन दिवसांमध्ये एकूण चार कोटी नऊ लाख 39 हजार रुपयांस दान साईबाबांच्या चरणी भक्तांनी अर्पण केला आहे. साईबाबांच्या शिर्डी मध्ये वर्षभरात अनेक विविध उत्सव साजरे होतात मात्र त्यातही रामनवमीचा उत्सव हा स्वतः साई बाबांनी सुरू केलेला असल्यामुळे या दिवसाला साई भक्तांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व मानलं जातं आणि यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक शिर्डीमध्ये दाखल होत असतात तसेच शिर्डीमध्ये भक्तांची मोठी मांदियाळी बघायला मिळते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -