घरमहाराष्ट्रनागपूरच्या चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू; जीन्स, स्कर्ट आणि तोकडे कपडे घालून...

नागपूरच्या चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू; जीन्स, स्कर्ट आणि तोकडे कपडे घालून दर्शनास मनाई

Subscribe

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. श्री गोपाळकृष्ण मंदिर (धंतोली), श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेल्लोरी-सावनेर), श्री बृहस्पती मंदिर (कनोलीबारा) आणि श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर (मानवनगर) येथे जीन्स, स्कर्ट, प्रक्षोभक आणि अशोभनीय परिधान केलेल्यांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. श्री गोपाळकृष्ण मंदिर (धंतोली), श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेल्लोरी-सावनेर), श्री बृहस्पती मंदिर (कनोलीबारा) आणि श्री हिलटॉप दुर्गामाता मंदिर (मानवनगर) येथे जीन्स, स्कर्ट, प्रक्षोभक आणि अशोभनीय परिधान केलेल्यांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे. हा ड्रेस कोड राज्यभरातील मंदिरांमध्ये लागू करण्याची योजना असल्याचे महाराष्ट्र मंदिर महासंघनाने म्हटले आहे. नागपूरनंतर महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यासाठी व्यापक मोहीम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. ( Dress code enforced in four temples of Nagpur Darshan is prohibited in jeans skirts and loose clothing )

महाराष्ट्र टेंपल फेडरेशनचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले की, ड्रेस कोड सरकारी कार्यालये, अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी, शाळा-कॉलेज, न्यायालये, अगदी पोलिसांमध्येही लागू आहे. त्या आधारे मंदिरांचे पावित्र्य, शिष्टाचार आणि संस्कृती जपण्यासाठी मंदिरांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरातील श्री गोपाळकृष्ण मंदिरात ड्रेस कोड बोर्ड लावल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

तोकडे कपडे घालून येऊ नका

यावेळी श्री गोपाळकृष्ण मंदिराचे विश्वस्त प्रसन्न पातुरकर, मंदिर समिती प्रमुख सौ.ममताताई चिंचवडकर, आशुतोष गोटे यांनी मंदिराचे पावित्र्य जपून भारतीय संस्कृतीचे पालन केले पाहिजे असे सांगितले. या हेतूने भाविकांनी प्रक्षोभक आणि तोकडे, कपडे परिधान करुन मंदिरात येऊ नये, ही विनंती. भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनाला सहकार्य करा, असं त्यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: Loksabha election : महायुतीत कुरबुर; शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्यानं भाजप नाराज? )

- Advertisement -

तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांच्या ड्रेस कोडवरुन यु टर्न

काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांनाच्यावतीने एक नियमावली जारी करण्यात आली होती. त्या नियमावलीचे फलक हे मंदिरात लावण्यात आले आहेत. बरमोडा, हाफ प‌ॅन्ट, उत्तेजक कपडे, तसचं अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेले अशा भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही, असं म्हटलं गेलं होतं. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर मंदिर प्रशासनाने यू टर्न घेत पुजेसाठी अथवा दर्शनासाठी आलेल्या कोणत्याही भाविकांना कोणतेही निर्बंध नसल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -