Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Loksabha election : महायुतीत कुरबुर; शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्यानं भाजप...

Loksabha election : महायुतीत कुरबुर; शिंदे गटाने 22 जागांवर दावा केल्यानं भाजप नाराज?

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भजाप शिवसेना या महायुतीत शिवसेना शिंदे गटाने 22 जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 48 पैकी 22 जागांवर शिवसेना दावा करत असल्यानं भाजपात नाराजीचे सूर आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भजाप शिवसेना या महायुतीत शिवसेना शिंदे गटाने 22 जागांवर दावा केला आहे. शिवसेनेने लोकसभेच्या 22 जागांवर दावा केल्याने नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 48 पैकी 22 जागांवर शिवसेना दावा करत असल्यानं भाजपात नाराजीचे सूर आहेत. (Loksabha election 2024 BJP and Shivsena Mahayuti may be in disputes due to Loksabha Election seat distribution )

2019 साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप झालं तेव्हा शिवसेनेने 23 तर भाजपने 25 जागा लढवल्या होत्या. आता याचाच दाखला देत शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -

गजानन कीर्तिकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून एकनाथ शिंदे गटाला सापत्नभावाची वागणूक मिळते आहे. शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक आहे. त्यामुळे आमच्या शिवसेनेला त्याप्रमाणे दर्जा आणि वागणूक मिळाली पाहिजे. मात्र, तसं होतना दिसत नाही. भाजपसोबत केंद्रामध्ये शिवसेनेचे 13 खासदार सहभागी आहे.

गजानन कीर्तिकर पुढे म्हणाले की, शिवसेना जर रालोआचा घटक असेल तर खासदारांची कामेही त्याच पद्धतीने झाली पाहिजेत. निवडणुकीमध्ये जागांचे वाटपही त्याच पद्धतीने व्हायला हवे. सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप 25 ते शिवसेना 23 जागा लढली होती. त्यापैकी आमचे 18 खासदार निवडून आले. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तसचं जागावाटप व्हावं. आम्ही लढवलेल्या जागा आमच्याकडे राहाव्यात त्यांनी लढवलेल्या जागा त्यांच्याकडे राहाव्यात, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या पक्षाच्या बैठकीत केली असल्याचं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

- Advertisement -

गजानन कीर्तीकर यांनी केलेल्या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. खास करुन आता एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात कोणतीच एकवाक्यता आणि सर्वच काही अलबेल आहे, असं खात्रीनं सांगता येत नाही, या दाव्यानं जोर पकडला आहे.

( हेही वाचा: खोटी आश्वासने आणि जनतेची दुरवस्था, काँग्रेसचे भाजपाला 9 वर्षातील 9 प्रश्न; वाचा सविस्तर )

कीर्तिकरांच्या वक्तव्यावर भाजपचं उत्तर

भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, शिवसेना हा आमचा मित्रपक्ष आहे. या पक्षाचं नेतृत्त्व पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करत होते. आता एकनाथ शिंदे हे नेतृत्त्व करत आहेत. युतीत एकनाथ शिंदे यांचा, शिवसेनेचा आणि त्यांच्या मागण्यांचा सन्मान होणार आहे.

- Advertisment -