घरमहाराष्ट्रदसरा मेळावा : शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गट आक्रमक; परवानगी द्या नाही...

दसरा मेळावा : शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे गट आक्रमक; परवानगी द्या नाही तर आता…

Subscribe

 येत्या दोन दिवसांत परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखीन दोन दिवस पालिकेच्या उत्तरासाठी वाट बघावी लागणार

मुंबई : शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 24 ऑक्टोबर रोजी ‘दसरा मेळावा’ घेण्यासाठी परवानगी मिळविण्याकरिता शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून पालिकेचे जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त यांना पत्रं देण्यात आली आहेत. ठाकरे गटातर्फे तर 3 ऑक्टोबर रोजी स्मरणपत्रही देण्यात आले होते. मात्र अद्यापही ठाकरे गटाला पलिकेकडून होकार अथवा नकार काहीच कळविण्यात आलेले नाही. त्यामुळे सोमवारी (9 ऑक्टोबर) पुन्हा एकदा शिवसेना आमदार व नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पुन्हा एकदा जी/ उत्तर विभागात धडक देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला. (Dussehra Gathering Thackeray Group Aggressive for Shivaji Park Maidan Allow not now…)

येत्या दोन दिवसांत परवानगीबाबत कळविण्यात येईल, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला आणखीन दोन दिवस पालिकेच्या उत्तरासाठी वाट बघावी लागणार आहे.

- Advertisement -

याप्रकरणी, शिवसेनेचे नेते आमदार अनिल परब यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही दोन महिन्यांपूर्वीच दसरा मेळाव्यासाठी पत्र दिले होते. मात्र तरीही आम्हाला आजपर्यंत पालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच, परवानगी देण्याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. आम्ही 3 ऑक्टोबर रोजी पालिकेला स्मरणपत्रही दिले होते. त्यामुळे आज आम्ही स्वतः विभाग कार्यालयात जाऊन विचारणा केली. त्यावर अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत कळविण्यात येईल, असे उतर दिले असल्याचे त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : सप्तश्रृंगी तीर्थक्षेत्राच्या 81 कोटींच्या आराखड्यास मान्यता; मुख्यमंत्र्यांकडून विकासकामांचा आढावा

- Advertisement -

तर शिवसेना पुन्हा न्यायालयात जाणार

शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर ‘दसरा मेळावा’ घेण्यासाठी ठाकरे व शिंदे गटाने केव्हा अर्ज दिले, असे विचारले असता आमदार अनिल परब यांनी सांगितले की, आम्ही 7 ऑगस्ट रोजी पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज दिला होता. तर शिंदे गटानेही 7 ऑगस्ट रोजीच अर्ज दिला आहे. तसेच, 1 ऑगस्ट रोजीही शिंदे गटाने अर्ज दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र 1 ऑक्टोबर रोजी अर्ज देणारे आमदार सदा सरवणकर यांचे फक्त नाव दाखवले जात असून, इतर काहीच माहिती नाही. त्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. जर दोन दिवसात तुम्हाला परवानगी न दिल्यास तुम्ही न्यायालयात जाणार का, असे विचारले असता, आमदार परब म्हणाले की, आम्ही त्याबाबत अमच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत. मात्र शिंदे व ठाकरे गटात शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळावा घेण्यावरून गतवर्षीही वाड झाला होता आणि तो वाद न्यायालयात जाऊन ठाकरे गटाला परवानगी मिळाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -