घरताज्या घडामोडीDawood Ibrahim money laundering case: नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीचा समन्स

Dawood Ibrahim money laundering case: नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीचा समन्स

Subscribe

अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. आज ईडीच्या या कारवाई विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसऱ्या बाजूला मलिकांच्या मंत्री पदाचा राजीनाम्यासाठी राज्यातील ठिकठिकाणी भाजप कार्यकर्ते नेते रस्त्यावर उतरले आहे. यादरम्यान नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीने समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. पण कप्तान मलिक यांनी समन्स बजावल्याचे फेटाळले आहे.

- Advertisement -

 

‘मलिक कुटुंबियांना कितीही दाबलं तरी थांबणार नाही’

कप्तान मलिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘एक युटर्न लॉ आहे. तुम्ही कोणाला कितीही दाबा पण तो दुप्पट वेगाने वरती येतो. तसंच मलिक कुटुंबियांना कितीही दाबलं तरी थांबणार नाही. आम्हाला नवाब मलिक वडिलांप्रमाणे आहेत. त्यामुळे ते जे काही आम्हाला आदेश देतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ. मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही.’

- Advertisement -

‘आरोप सिद्ध झाले तर आम्हाला गोळ्या घाला’

पुढे कप्तान म्हणाले की, ‘नवाब मलिकांवर माझा विश्वास आहे, त्यांनी आयुष्यात कधी काही चुकी केली नाही आणि करणारही नाहीत. जर मलिकांवरील आरोप सिद्ध झाला, तर या गांधीच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून लोकांना आम्ही बोलणार गोळी मारा. आमचा अंडरवर्ल्डबरोबर कोणताही संबंध नाही. आता आम्हाला किती दाबायचं आहे, दाबून द्या, देव सगळं काही पाहतोय.’

दरम्यान काही तासांपूर्वी नवाब मलिक यांच्या बहीण डॉ. सईदा खान ईडी कार्यालयाबाहेर पोहोचल्या होता. पण तिथे त्यांना अडवण्यात आले. त्या म्हणाल्या की, ‘सत्तेचा गैरवापर करून नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. कोणताही प्रोटोकॉलचे पालन केले नाही. केंद्रातील भाजप सरकार अस्वस्थ आहे. मलिकांची अटक ही सूडबुद्धीने करण्यात आली आहे. मी त्यांची फॅमिली फिजिशियन आहे, त्यामुळे मी त्यांना भेटायला गेले होते. त्यांनी मला कार्यालयात जाण्याची परवानगी दिली, पण त्यांना भेटू दिले नाही. आम्ही लिफ्टमध्ये भेटलो. मला त्यांनी सांगितले की, ही सत्याची लढाई असून आपल्याला एकत्र राहायचे आहे आणि लोकं आपल्यासोबत आहेत.’


हेही वाचा – Nawab Malik : आव्हाडांनी दाखवली नवाब मलिकांच्या ED च्या रिमांड कॉपीतील चूक, म्हणाले 10 रूपयांच्या गोळ्या…


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -