घरताज्या घडामोडीसुप्रिया सुळे दिसल्या शिवसेनेच्या रणरागिणींच्या घोळक्यात, म्हणाल्या नैतिकतेवर...

सुप्रिया सुळे दिसल्या शिवसेनेच्या रणरागिणींच्या घोळक्यात, म्हणाल्या नैतिकतेवर…

Subscribe

अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मलिकांच्या अटकेचा परिणाम फक्त महाराष्ट्रात नाही तर सध्या निवडणुकीचे वारे वाहत असलेल्या उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्येही दिसून येत आहे. तसेच आता राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष वाढला आहे. आज महाविकास आघाडी सरकार मलिकांच्या समर्थनार्थ तर मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे. नैतिकतेवर बोलण्याचा कोणालाही अधिकारी नाहीये, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

नैतिकतेवर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही

नवाब मलिकांच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू आहे. यावेळी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. राजीनामा घेण्यात यावा नाहीतर नैतिकतेचा प्रश्न उपस्थित होतो असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नैतिकतेवर बोलण्याचा कोणालाही अधिकारी नाहीये. मी माझी पातळी सोडून कधीही बोलत नाही. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार आहेत. तसेच माझ्यावर मराठीचे संस्कार आहेत. साधारण भारतातील स्त्री आणि महिला ही खूप अन्याय सहन करते. परंतु जेव्हा त्याचा अतिरेक होतो. तेव्हा ती झाशीची राणी सुद्धा होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक करू नये आणि नैतिकतेच्या गोष्टी करू नका. कारण आम्ही सत्तेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत.

- Advertisement -

भाजपने शेतकऱ्यांना सुद्धा सोडलं नाही

किरीट सोमय्या गेले सात वर्षे सत्तेमध्ये आहेत. तसेच महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये देखील त्यांचा समावेश होता. त्यावेळी तुम्हाला या गोष्टी दिसल्या नाहीत. नवाब मलिक तुमच्या विरोधात बोलले की ते दहशतवादी होतात. भाजपने शेतकऱ्यांना सुद्धा सोडलं नाही. तसेच त्यांनी काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला दहशतवादी म्हटलं होतं. महाराष्ट्रातील महिलेच्या तोंडून छोटासा देखील शब्द आला तरी तिच्या डोळ्यांत पाणी येतं. जेव्हा तिचा संघर्ष करायची वेळ येते. तेव्हा ती झाशीची राणी बनून उभी राहते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

दरम्यान, नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, यासाठी महाराष्ट्रातील काही भागांत भाजपचं आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून आंदोलनं केली जात आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : Aangnewadi jatra 2022 : आंगणेवाडी जत्रोत्सवाला सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करत श्री भराडी देवीचा जत्रोत्सव


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -