Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून धावणार आठ ई-शिवाई बस; 'असं' आहे वेळापत्रक

स्वारगेट ते कोल्हापूर मार्गावर आजपासून धावणार आठ ई-शिवाई बस; ‘असं’ आहे वेळापत्रक

Subscribe

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आण आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशानं वेळोवेळी विविध बदल एसटी प्रशासनातर्फे केले जातात. यासबोतच प्रदूषण नियंत्रणासाठीदेखील एसटी प्रशासनाकडून विविध मार्गांवर ई-बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी स्वारगेट ते कोल्हापूर या मार्गावर ई- शिवाई बसला सुरूवात करण्यात आली. पुणे विभागातून 4 बसेस आणि कोल्हापूर विभागातून 4 अशा 8 बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत.

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित आण आरामदायी प्रवास करता यावा या उद्देशानं वेळोवेळी विविध बदल एसटी प्रशासनातर्फे केले जातात. यासबोतच प्रदूषण नियंत्रणासाठीदेखील एसटी प्रशासनाकडून विविध मार्गांवर ई-बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी स्वारगेट ते कोल्हापूर या मार्गावर ई- शिवाई बसला सुरूवात करण्यात आली. पुणे विभागातून 4 बसेस आणि कोल्हापूर विभागातून 4 अशा 8 बसेस या मार्गावर दररोज धावणार आहेत. (Eight E Shiwai buses will run on Swargate to Kolhapur route from today this is the schedule)

याआधी पुण्यातून पुणे ते नाशिक मार्गावर 18, पुणे ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर 10 ई- शिवाई बसेस धावत आहेत. शुक्रवारपासून यामध्ये पुणे ते कोल्हापूर मार्गावर 8 ई-शिवाई धावण्यास सुरूवात झाली आहे.

- Advertisement -

एसटी महामंडळाकडून पाच हजार ई-बस घेण्यात येणार आहेत. त्या ई-बस राज्यात ई-शिवाई नावाने चालवल्या जाणार आहेत. या ई-बस टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या विभागाला देण्यात येणार आहेत. एसटीच्या पुणे विभागात देखील बस तयार होतील तशा टप्प्या-टप्प्याने बस दाखल होत आहेत. राज्यातील पहिली ई-बस पुणे-अहमदनगर मार्गावर सुरू केली होती. त्यानंतर बस दाखल झाल्यानंतर त्या पुण्यातून वेगवेगळ्या शहरात सुरू केल्या जात आहेत. आता पुण्यातून मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या मार्गावर ई-शिवाई व ई-शिवनेरी सुरू केल्या आहेत. या बसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

( हेही वाचा: नाफेड, एनसीसीएफचा कांदा लिलावात थेट सहभागी होण्यास नकार; कांदाप्रश्न चिघळणार? )

‘असं’ आहे वेळापत्रक

  • स्वारगेट कोल्हापूर: सकाळी 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10.30, दुपारी 1.30, 2.30, 3.30, सायंकाळी 7.30
  • कोल्हापूर स्वारगेट– सकाळी 5.00, 5.30, 6.30, 9.00, 9.30, 10.30, दुपारी 1.30, 2.30, 3.30, सायंकाळी 7.30
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -