घरक्राइम4 खासगी बसेसची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकत्यांना अटक; भाईंदरमधील प्रकार

4 खासगी बसेसची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकत्यांना अटक; भाईंदरमधील प्रकार

Subscribe

भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना समोर अवैध बस पार्किंग होत असतात. त्यातच 20 डिसेंबर 2020 रोजी भाईंदर पूर्वेच्या भोला नगरमधील एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पोत्यात बांधून फेकण्यात आले होते.

मीरा (भाईंदर) : भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाच्या बाहेर रात्रीच्या वेळेल्या पार्किंग केलेल्या चार खासगी बसेसची मनसेंकडून गुरुवारी रात्री तोडफोड करण्यात आली होती, त्यानुसार भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अद्यापही 15 ते 20 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. (4 MNS activists arrested for vandalizing private buses; Type in Bhayander)

भाईंदर पश्चिमेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना समोर अवैध बस पार्किंग होत असतात. त्यातच 20 डिसेंबर 2020 रोजी भाईंदर पूर्वेच्या भोला नगरमधील एका चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पोत्यात बांधून फेकण्यात आले होते. यामुळे शहरातील अवैध बस, ट्रक पार्किंगचा विषय गंभीर झालेला दिसून आला होता. त्यानंतर पालिका व पोलिसांनी कारवाई केली होती, मात्र कालांतराने पुन्हा ती कारवाई थंडावली आणि पुन्हा अवैध बसेस पार्किंगला ऊत येऊ लागल्याचे दिसून येत आहे. या अवैध पार्किंग पोलीस व पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू असल्याचे अनेकदा उघड झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोकणवासी 1 सप्टेंबरपासून घेणार चिपी विमानतळावरून टेकऑफ; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

मुंबईत जागा नसल्याने घेतला आधार

मुंबईत पार्किंगला जागा नसल्याने मुंबईतील बस मालक मीरा भाईंदर शहरातील सुभाषचंद्र बोस मैदान, रामदेव पार्क रोड, इंद्रालोक परिसर, काशीमीरा व मिरारोड पूर्व नया नगर रेल्वे समांतर रस्ता या ठिकाणी अवैध पार्किंग करत असतात.

- Advertisement -

हेही वाचा : Cyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

म्हणून झाली होती मनसे आक्रमक

मागे एका चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला होता, त्यानुसार स्थानिक राजकीय नेत्यांनी कारवाई करण्याची पालिका व स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिसांकडे केली होती, मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे पाठीमागे घालत असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिका शहर युनिट अध्यक्ष कामगार सेनेचे हरेश सुतार, उपविभाग अध्यक्ष आशिष वन्ने, कार्यकर्ते विकी वैद्य या तिघांना अटक केली असून 15 ते 20 जण फरार तिघांना ठाणे न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -