घरताज्या घडामोडीपंकजांचा पराभव झाला नाही, केला गेला - एकनाथ खडसे

पंकजांचा पराभव झाला नाही, केला गेला – एकनाथ खडसे

Subscribe

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. 

विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोहोंमध्ये विधानसभेची लढत रंगली. पंकजा मुंडे यांनी विधानसभेतील पराभव स्वीकारला असला तरी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र आज खळबळजनक खुलासा केला आहे. पंकजांचा पराभव झाला नाही तर केला गेला, असे म्हणत पंकजांना बोलता येत नसलं तरी तिच्या वेदना जाणतो, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर आरोप केला. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. व्यासपीठावर बोलताना एकनाथ खडसे भावूक झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. एकनाथ खडसे यांच्या स्फोटक भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

  • मुंडेंच्या मतदारसंघात पंकजा पराभूत झाल्या हे दुःख
  • गोपीनाथरावांची मुलगी हरल्याचे मला खूप दुःख
  • हे घडलं नाही हे घडवलं गेलंय
  • पंकजाला बोलता येत नाही पण तिच्या वेदना जाणतो
  • पंकजा मुंडेंची कायम साथ देणार
  • भाजपमध्ये कुणीतरी छळतंय जानकरांचा आरोप
  • मुंडेंच्या काळातला भाजप आम्ही अनुभवला
  • महाराष्ट्रात भाजपला उभारी देणाचं काम मुंडेंनी केलं
  • भाजपला बहुजन चेहरा देण्याचं काम मुंडेंनी केलं
  • भाजपच्या जडणघडणीमध्ये मुंडेसाहेबांचा मोलाचा वाटा
  • सामान्य कार्यकर्त्याला घडवला त्याला उंचीवर नेण्याचं काम मुंडेंनी केलं
  • मुंडेंनी कधीही पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. जे बोलणार ते समोर बोलणार ही त्यांची भूमिका.
  • ओक्साबोक्शी रडावंस वाटतं, आज कोण आहे माझ्यामागे? तुम्ही आहात म्हणूनच आम्ही जगतोय.
  • ‘हम तो डुबेंगे सनम, तुमको भी लेकर डुबेंगे’, असं मुंडेंनी कधी केलं नाही
  • शेटजीभटजींच्या पक्षाला बहुजनांचा पक्ष म्हणून मान दिला
  • गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं एकनाथ खडसे भावूक
  • माझा आधारस्तंभ नाही याची मला खंत
  • आज जे चित्र आहे ते जनतेला मान्य नाही
  • गोपीनाथ मुंडेंसोबत जवळून काम करण्याची संधी
  • बागडे म्हणाले की पक्षविरोधात बोलू नका
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -