घरमहाराष्ट्रआमदार दिलीप सोपल यांनी दिला राजीनामा; उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

आमदार दिलीप सोपल यांनी दिला राजीनामा; उद्या करणार शिवसेनेत प्रवेश

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी विधनसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी विधनसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या चित्ते पिपंळ गाव येथे जाऊन दिलीप सोपल यांनी राजीनामा दिला. यावेळी दिलीप सोपल यांच्या सोबत शिवसेना नेते सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. दिलीप सोपल उद्या, बुधवारी शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

dilip sopal
दिलीप सोपल

आमदार दिलीप सोपल यांनी आज, मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील चित्ते पिंपळ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. तर बागडे यांनीही सोपल यांचा राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, माजी मंत्री सचिन अहिर यांच्यापाठोपाठ सोपल यांनीही शिवसेनेची वाट धरल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे.

- Advertisement -

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना-भाजपमध्ये इतर पक्षातील आमदारांचे प्रवेस वाढत चालले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्य जास्त आहे. यापूर्वी मुंबई शहर अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी राज्यात मोठे खिंडार पडले आहे.

हेही वाचा –

राज ठाकरे यांच्या कट्टर समर्थकाने केली आत्महत्या

- Advertisement -

‘जनतेचे प्रत्युत्तर मिळूनही राहुल गांधींची हौस फिटत नाही’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -