घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी उपोषण !

मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्तीसाठी उपोषण !

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुरवस्था दूर व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या लता साने-कळंबे यांचे उपोषण दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे. शासनाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याने आश्चर्याची भावना व्यक्त होत आहे.पनवेल तालुक्यातील पळस्पे फाटा येथून सुरू होणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (क्रमांक 66) कमालीची दुर्दशा झाली आहे. या मार्गावरून प्रवास म्हणजे शिक्षा असल्याचा प्रवासी व वाहनचालकांचा अनुभव आहे. वेळ व इंंधनाची नासाडी करणार्‍या या महामार्गाचे गेल्या दहा वर्षांपासून रूंदीकरणाचे काम सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान खड्डे बुजविण्याचे काम झाले की आपले काम संपले, अशी संबंधितांची मानसिकता झाल्याने त्यात प्रवासी भरडून निघत आहेत.

महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार, अशा घोषणा वारंवार झाल्या असल्या तरी त्यात काहीच तथ्य नसून जनतेला निव्वळ मूर्ख बनविण्याचे काम सुरू असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साने-कळंबे यांनी बुधवारपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. शासन ठोस लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

- Advertisement -

साने-कळंबे यांनी रायगड जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत 2016 पासून अनेकदा उपोषण करून ते मार्गी लावले आहेत. जांभुळपाडा पूल, पाली येथील अंबा नदीवरील पूल, वाकण-खोपोली महामार्गावरील खुरवले फाटा येथे वाहून गेलेला रस्ता दुरुस्ती, महामार्गावर दिशादर्शक फलक, रेलिंग अशी कामे त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून मार्गी लावली आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत संताप असल्याने साने-कळंबे यांच्या उपोषणाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -