घरमहाराष्ट्रकल्याणमध्ये नागिणीने दिला १३ पिल्लांना जन्म!

कल्याणमध्ये नागिणीने दिला १३ पिल्लांना जन्म!

Subscribe

ही सर्व पिल्ले सुदृढ व सुखरूप असून लवकरच त्यांना निर्सगमुक्त करण्यात येणार

वॉर रेस्क्यू फाउंडेशन ही संस्था वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी कार्य करीत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत दिड महिन्यापूर्वी विषारी प्रजातीच्या नागिणी सापाला वाचविण्यात वॉर रेस्क्यू टिमच्या सदस्यांना यश आले होते. रेस्क्यू केल्यानंतर काही वेळात त्या नागीणीने कल्याणमध्ये १३ अंडी दिल्याचे निदर्शनास आले होते. या नागीणीला तात्काळ निर्सगमुक्त करून अंडी वनविभागांच्या मार्गदर्शनाखाली व तज्ञाच्या देखरेखीखाली कृत्रिमरीत्या उबवून काळजी घेत होते, यासंदर्भात वार रेस्क्यु फाऊंडेशन कल्याणचे वन्यजीव संरक्षक योगेश कांबळे यांनी माहिती दिली आहे.

रविवारी दुपारच्या वेळी अंड्यातून पिल्ले बाहेर पडताना निदर्शनास आले असून ही सर्व पिल्ले सुदृढ व सुखरूप असून लवकरच त्यांना निर्सगमुक्त करण्यात येणार असल्याचे वॉर रेस्क्यू टिम कडून सांगण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा वॉर रेस्क्यूचे सदस्य सापांना वाचविण्यासाठी झटत आहेत. आपल्या विभागत कधी साप आल्यास किंवा वन्यजीवांबाबत तक्रार असल्यास हॅलो फॉंरेस्ट १९२६ या टोल फ्री नंबर संपर्क साधावा किंवा वॉर रेस्क्यू टिम च्या ९८६९३४३५३५ किंवा ७२०८३४९३०१ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


मुंबईत महापालिकेच्याच शाळेने केला श्रीगणेशा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -