घरCORONA UPDATEप्लाझ्मा थेरेपीच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक केल्यास कारवाई - अनिल देशमुख

प्लाझ्मा थेरेपीच्या नावाखाली रुग्णांची फसवणूक केल्यास कारवाई – अनिल देशमुख

Subscribe

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरेपी ही उपयुक्त ठरत आहे. परंतु प्लाझ्मा थेरेपीच्या संदर्भात फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे यापासून सावध राहावे, असे आवाहन  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. डॉक्टरांची मते व निरीक्षणावरून ‘प्लाझ्मा थेरपी’ कोविड -१ रूग्णांसाठी एक उपचार पद्धती म्हणून उदयास आली आहे. जास्तीत जास्त कोविड रूग्णांना  मदत करण्यासाठी विविध राज्य व रुग्णालयांनी प्लाझ्मा बँक आणि प्लाझ्मा देणगी (डोनेशन) मोहीम सुरू केली आहे. प्लाझ्मा देणगीदाराच्या कमतरतेमुळे ही थेरेपी महाग आहे.

काही निवडक रुग्णालयात ही उपचार पद्धती करण्यात येते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, कोरोनातून बरे झालेले बेरोजगार तरुण आवश्यकतेनुसार थेट लोकांना प्लाझ्मा दान देताना आढळून आले आहेत. प्लाझ्मा दान  करण्यासाठी कोविडमधून बरे झाल्याचा वैद्यकीय अहवाल आणि प्लाझ्मा दान करण्यास तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. गरजू लोकांच्या बिकट परिस्थितीचा फायदा घेत त्यांना फसवण्याचा उद्देशाने बनावट प्रमाणपत्र देखील तयार केली जात आहेत. ही खोटी प्रमाणपत्रे दाखवून लाखो रुपये  गरजू रुग्णांना कडून घेतले जाऊ शकतात.

- Advertisement -

सायबर गुन्हेगार यासाठी समाज माध्यमांवर विविध युक्त्या देखील वापरत आहेत. डार्क वेब आणि बेकायदेशीर वाहिन्यांवर प्लाझ्माची विक्री संदर्भात फसवणूक होऊ शकते. त्या विरुद्ध कडक कारवाई होईल, असा इशारा अनिल देशमुख यांनी दिला. या प्लाझ्मा थेरेपी उपचाराबाबत जागरूक रहावे. प्लाझ्मा दाता ऑनलाईन शोधताना काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोणत्याही कोविड उपचाराच्या सुरक्षित पद्धतीवरच अवलंबून असले पाहिजे, असे म्हणत याबाबत फसवणूक झाल्यास नजिकच्या पोलिस स्टेशनला कळवा किंवा तक्रारीसाठी www.cybercrime.gov.in या वेबसाईट तक्रार नोंद करा, असे आवाहन त्यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा –

ठाणे, पुणे नंतर मुंबईतही लॉकडाऊन? आयुक्तांनी केला सर्वात मोठा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -