घरमहाराष्ट्रनाशिकअखेर ! 'त्या' तमाशा कलावंत शांताबाई लोंढे यांचे झाले पुनर्वसन

अखेर ! ‘त्या’ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे यांचे झाले पुनर्वसन

Subscribe

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे (कोपरगावकर) यांची रविवारी (दि.25) द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान करीत त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल असे जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन दिवसापासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ.अशोक गावित्रे यांनी त्यांना २४ जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते.

- Advertisement -

शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर, कोपरगाव येथे रहात होत्या. ते त्यांचा सांभाळ करीत आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावरील पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. शांताबाई लोंढे-कोपरगांवकर यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचलनालय, मुंबई यांची वृद्ध कलावंत मानधन योजना सन- २००९ पासून त्यांना वर्ग ’क’ कलाकार म्हणून दर महिन्याला २२५० रुपये मानधन मिळत आहे. त्यांचे में २०२३ महिन्याचे मानधन त्यांच्या स्टेट बॅक इंडियाच्या बँक खात्यावर ८ जून २०२३ रोजी जमा झाले आहे.

असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी यावेळी सांगितले. ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती शांताबाई लोंढे ( कोपरगावकर) यांना कोपरगाव तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर केला आहे. त्यानूसार त्यांना एक हजार रूपये दरमहा मानधन मिळणार आहे. दुबार रेशनकार्ड जिवित व ऑनलाईन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ, तसेच केंद्र पुरुस्कृत कलाकार मानधन योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -