घरमहाराष्ट्रपहिल्या महिला बसचालकाची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव; अधिकाऱ्यांकडून दुजाभाव, नोकरीवरुनही काढले

पहिल्या महिला बसचालकाची न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव; अधिकाऱ्यांकडून दुजाभाव, नोकरीवरुनही काढले

Subscribe

लक्ष्मी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेस्टचे अधिकारी माझ्या सतत चुका दाखविण्याचे काम करत राहले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रातील पहिल्या महिला बस चालक म्हणून बहुमान मिळालेल्या लक्ष्मी जाधव यांना त्यांच्या नोकरीचा राजीनामा आणि माफिनामा बळजबरीने लिहून घेतल्याचा आरोप त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. तर आपले आर्थिक, सामाजिक,शैक्षणिक नुकसान होत असल्याने न्याय द्यावी अशीही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.(First woman bus driver runs to CM for justice Abused by the authorities removed from the job)

मुलुंड पश्चिम भागात राहणाऱ्या लक्ष्मी दिलीप जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीने चालक म्हणून काम करतात. ही नियुक्ती मागील 25 मे 2022 रोजी करण्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्रातील पहिल्या महिला चालक म्हणून माझ्या कार्याचे कौतूक झाले होते. त्याचा आनंद मलाही झाला होता. मात्र, काहीच दिवसानंतर माझ्यासोबत काही विपरीत घडत आहे. कारण, बेस्ट अधिकारी कंत्राटदार यांचे नेमलेले अधिकारी यांनी मला खूप मानसिक त्रास दिला असल्याचे त्यांनी केलेल्या पत्रात नमूद आहे. पुढे त्यांनी लिहले की, यामुळे माझी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सर्व बाबीतून नुकसान होत आहे. मी महिला आहे बस चालवते याचाच तिरस्कार या अधिकाऱ्यांना आहे असेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी नमुद केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : शरद पवार केंद्र सरकारविरोधात आक्रमक, केंद्रीय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला केला विरोध

सतत चुका दाखविण्याचे काम करण्यात आले

लक्ष्मी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बेस्टचे अधिकारी माझ्या सतत चुका दाखविण्याचे काम करत राहले आहेत. महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे किंवा ते वाहन चालक आहे व अनेकमहिला आपल्या या क्षेत्रामध्ये येऊ शकतात अशी भिती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून या अधिकाऱ्यांनी माझा छळ करून मला मानसिक त्रास देऊन मला अनेक वेळा कामावरून अडवणूक केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : खळ्ळखट्याक : राज ठाकरेंचा सकाळी आदेश; कार्यकर्त्यांनी दुपारी कंपनीचे ऑफिस फोडले

इच्छा नसतानाही घेतला राजनीमाना लिहून

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीत लक्ष्मी जाधव यांनी म्हटले आहे की, मला कोणतेही कारण न देता कामावरती रुजू करण्यात अडचण निर्णा केली आहे. माझी इच्छा नसतानाही माझ्याकडून जबरदस्तीने राजीनामा लिहगून घेतला आहे. व त्यामध्ये विशेष बाब त्यांनी मला त्याची साधी कॉपीही दिली नाही. या अधिकाऱ्यांना माझा एवढा तिरस्कार आहे की, त्यांना एका महिलेशी कसे बोलावे हे सुद्धा कळत नसल्याचा उल्लेखही लक्ष्मी जाधव यांनी त्यांच्या तक्रार पत्रात केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -