घरमहाराष्ट्रवृद्धाकडून ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

वृद्धाकडून ५ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

Subscribe

देशात दररोज बलात्कार, विनियभंग सारख्या घटना घडत आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरण ताजे असताना पिंपरी-चिंचवड येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकील आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे अमिश दाखवून ६७ वर्षीय जेष्ठ नागरिकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात पीडित चिमुकलीच्या आजीने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात (वय ६७) असे लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी जेष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्याला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नेहरू नगर येथे इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आरोपी भाऊराव उर्फ आप्पा बळीराम खरात यांचं घरातच किराणा दुकान आहे. तिथे पाच वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचे अमिश दाखवून तिच्याबरोबर लैंगिक चाळे केले. यावेळी आरोपीच्या घरात कोणी नव्हते, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पाच वर्षीय चिमुकलीने काही तासांनी झालेला प्रकार आपल्या आजीपाशी बोलून दाखवला. त्यामुळे ही गंभीर घटना उघडकीस आली. या घटनेप्रकरणी आरोपी भाऊराव याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उत्कर्षा देशमुख या करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -