घरमुंबईकल्याण स्टेशनवर बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह; डोके गायब

कल्याण स्टेशनवर बॅगेत आढळला महिलेचा मृतदेह; डोके गायब

Subscribe

पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण तपासले असून त्यानुसार आरोपींचा शोध सुरु आहे.

कल्याण स्टेशन परिसरात एका बॅगमध्ये महिलेचा अर्धवट मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलीस संशयीत आरोपींचा शोध घेत आहेत, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. कल्याण पश्चिमेतील स्टेशनसमोर असलेल्या टॅक्सी रिक्षा स्टॅण्डला आज पहाटे ५.४५ वाजताच्या सुमारास एक काळ्या रंगाची मोठी बॅग काही प्रवाशांनी बघितली. याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस आणि कल्याण महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. त्या ठिकाणी पोलिस पोहचले. पोलिसांनी ही बॅग उघडून पाहताच त्यात एका महिलेचा अर्धटव मृतदेह होता. त्यात धड नसलेले शरीर होते.

मृतदेह रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. कल्याण जीआरपी पोलिसांनी तपास सुरु केला असून स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दोन इसम कल्याण रेल्वे स्थानकातून एक काळ्या रंगाची बॅग घेऊन येताना दिसून येत आले. दोन पैकी एक इसम ज्याने लाल रंगाचा शर्ट घातला होता. तो पळताना दिसत आहे. पोलिसांना संशय आहे की, ही व्यक्ती ती काळ्या रंगाची बॅग घेऊन आला. त्याच्या सोबत अन्य एक ते दोन व्यक्ती असण्याची शक्यता आहे. कल्याण एसीपी अनिल पोवार अणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश लोंढे या दोघांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणाचा तपासाठी चार पथके नेण्यात आली आहे. ही महिला कोण आहे. तिची हत्या का करण्यात आली. तिचे उर्वरीत डोके कुठे आहे. हत्या करणारे कोण आहेत? याचा तपास पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -