घरमहाराष्ट्रतानसा अभयारण्यात विदेशी पक्षी चार महिने मुक्कामी; पक्षीनिरक्षकांना पर्वणी

तानसा अभयारण्यात विदेशी पक्षी चार महिने मुक्कामी; पक्षीनिरक्षकांना पर्वणी

Subscribe

सध्या हिवाळ्या मोसमातील पक्षी तानसा आभयारण्यात येणाऱ्या पक्षी निरीक्षक निसर्ग प्रेमी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत

महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच या अभयारण्यांन पाठोपाठ तानसा अभयारण्य पक्षीनिरीक्षक आणि निसर्ग प्रेंमीच्या पसंतीस उतरलं आहे हिवाळ्या मोसमात तानसा जलाशय परिसरात मुक्कामी असलेले विदेशी पक्षांचे थवे विशेष लक्ष वेधत आहेत . ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्याच्या ३२० चौरस किलोमीटर आभयाण्याच्या क्षेत्रात एकुण २१२ पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत त्यातील ५५ पक्षी तानसा तलावाच्या आसऱ्यावर राहत आहेत. यात झाडावर वास्तव्य करणारे १२६ पक्षी आहेत असे तानसा वन्यजीव विभागातून सांगण्यात येत आहे.

पक्षीनिरक्षकांना पर्वणी

तलाव आणि आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलातील दुर्मिळ पक्षी हिवाळ्याच्या चार महिन्यांत पक्षी निरीक्षकांना रोज नजरेस पडतील तानसाच्या जंगलात वेगवेगळ्या रंगाचे पक्षी खास हिवाळ्या मोसमात सध्या पक्षीनिरीक्षक तसेच निसर्ग प्रेमींना साद घालत आहेत. तानसा अभयारण्यात हिवाळ्याच्या मोसमात देशी आणि परदेशी पक्षी प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर येथे संचार करताना आढळतात. पावसाळ्यात पूर्व आफ्रीका देशातून भारतात येणारा स्थलांतरीत पक्षी चातक येथे पावसाळ्यात आढळतो सध्या हिवाळ्या मोसमातील पक्षी तानसा आभयारण्यात येणाऱ्या पक्षी निरीक्षक निसर्ग प्रेमी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

- Advertisement -

विदेशी पक्षी चार महिने मुक्कामी

तानसाच्या घनदाट जंगलात पावश्या, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळदया, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक टक्कोचोर, सुतार,टिटवी खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता, गरुड, घार, सादबहीणी, करकोचा, पोपट, मोर आदि विविध पक्षी तानसा आभयारण्यात वास्तव्य करीत आहेत. काही दुर्मिळ असलेले विदेशी स्थलांतरीत पक्षी भातसा, तानसा, वैतरणा, या परिसरातील घनदाट जंगलात मुक्कामी आहेत. जलाशय अभयारण्यात या पक्ष्यांचे सर्वत्र भ्रमण सुरु असते. वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणाऱ्या लाल पिवळ्या काळ्या निळ्या हिरव्या रंगाचे हे पक्षी सर्वांनचेच आता लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या सवयी आवाज खाद्य शिकारीच्या पध्दती राहण्याची ठिकाणे घरटी वेगवेगळी पहावयास मिळतात. हे सर्व पक्षी तानसाच्या जंगलात आढळतात. महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फणसाड पेंच या अभयारण्याबरोबर तानसा आभयारण्यातही हे पक्षी न्याहाळण्यासाठी पक्षी निरीक्षकांसह निसर्गप्रेमींच्या वाटा तानसा आभयारण्याकडे सध्या वळल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -