घरमहाराष्ट्र'त्या' पोलिसाच्या हत्येप्रकरणी आणखी चौघांना अटक

‘त्या’ पोलिसाच्या हत्येप्रकरणी आणखी चौघांना अटक

Subscribe

समाधान माटे यांची हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येवू नये म्हणुन हॉटेल 'रत्ना डिलक्स' चा व्यवस्थापक नदाफ याने मालक कुमार कुमसगे याला फोन करुन माहीती दिली पण कुमार कुमसगे यांच्या सांगण्यावरुन समाधान माटे यांचा मृतदेह नदाफने वेटरांच्या मदताने हॉटेल परीसरीतुन बाहेर फेकण्यात आला

काही दिवसांपुर्वी सांगलीत बहुचर्चित असणाऱ्या हॉटेल रत्ना डिलक्समध्ये पोलीस शिपाई समाधान माटे याची किरकोळ वादातुन तब्बल १८ वेळा चाकुचे वार करत हत्या करण्यात आली होती. या घटनेचा थरार सिसीटिव्हीत कैद झाला होता. हॉटेलच्या परीसरात अज्ञातांनी केलेल्या या हल्ल्यात पोलीस शिपाई समाधान माटे यांचा जागीच मृत्यू झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. पण या प्रकरणी आता सांगली पोलीसांतर्फे आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे.

नक्की काय झालं

हॉटेल ‘रत्ना डिलक्स’चा मालक कुमार कुमसगे (वय ४८ वर्ष) व व्यवस्थापक शब्बीर नदाफ या दोघांना (वय ४५ वर्ष) अखेर शनिवारी रात्री अटक करण्यात आली. मांटे यांचा मृतदेह हॉटेलबाहेर फेकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हत्या झाल्यानंतर हे प्रकरण अंगलट येवू नये म्हणुन हॉटेल ‘रत्ना डिलक्स’ चा व्यवस्थापक नदाफ याने मालक कुमार कुमसगे याला फोन करुन माहीती दिली पण कुमार कुमसगे यांच्या सांगण्यावरुन समाधान माटे यांचा मृतदेह नदाफने वेटरांच्या मदताने हॉटेल परीसरीतुन बाहेर फेकण्यात आला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर मालक कुमार कुमसगे याला सह्याद्रीनगर मध्ये असणाऱ्या त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. सध्या यातल्या काही वेटरांना पोलिसांनी सोडून दिले असून यासंदर्भातला अधिक तपास सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -