घरफिचर्सछोट्यांचा मोठा मंत्र!

छोट्यांचा मोठा मंत्र!

Subscribe

सर्वशक्तिमान फुटबॉल संघांच्या साम्राज्याला मात देत क्रोएशिया,बेल्जियम,रशियासारख्या संघांनी स्पर्धेत जी मुसंडी मारली ती थक्क करणारी होती. ही विश्वचषक स्पर्धा कोण जिंकणार ? असा प्रश्न विचारल्यावर जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, स्पेन,इंग्लंड अशी मोजकी नावे पुढे यायची. वृत्तपत्रांचे रकाने, इंटरनेट, टीव्ही, समाजमाध्यमे सर्वत्र मेस्सी, रोनाल्डो, नेयमार, म्यूलर यांचीच चर्चा होती.

कुठल्याही बलाढ्यसाम्राज्याला कधीतरी उतरतीकळा लागतेच.जागतिक फुटबॉलच्या इतिहासात गेली बरीच वर्षे दिमाखात वावरणारे तगडेसंघ रशियात मात्र सपशेल अपयशी ठरले. लाखो चाहत्यांच्या साक्षीने रशियात रंगलेली यंदाची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खर्या अर्थाने रशियन क्रांती होती. सर्वशक्तिमान फुटबॉल संघांच्या साम्राज्याला मात देत क्रोएशिया,बेल्जियम,रशियासारख्या संघांनी स्पर्धेत जी मुसंडी मारली ती थक्क करणारी होती. ही विश्वचषक स्पर्धा कोण जिंकणार ? असा प्रश्न विचारल्यावर जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, स्पेन,इंग्लंड अशी मोजकी नावे पुढे यायची. वृत्तपत्रांचे रकाने, इंटरनेट, टीव्ही, समाजमाध्यमे सर्वत्र मेस्सी, रोनाल्डो, नेयमार, म्यूलर यांचीच चर्चा होती. जगभरातील ३२ संघ या स्पर्धेत सहभागी झाले असले तरी स्पर्धेच्या आयोजनात स्पर्धेची ओळख दाखवण्यासाठी याच स्टार खेळाडूंच्या चेहर्यांचा वापर करण्यात आला. रोनाल्डो महान की मेस्सी? नेयमारचा खेळ सरस की म्यूलरचा? अशाच चर्चा झडत होत्या. परंतु, स्पर्धेचे खरे स्वरूप जर्मनी, अर्जेंटिना, पोर्तुगाल या संघांची पिछेहाट होण्यास सुरूवात झाल्यावर समजायला लागले. गतविजेत्या जर्मनीला पहिल्याच सामन्यात मेक्सिकोकडून ०-१ अशापराभवाचा सामना करावा लागला. ’अजेय,बलाढ्य संघ’ या संकल्पनेला खऱ्या अर्थाने सुरूंग लागण्यास सुरूवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीतील सामन्यातदेखील आपल्या तुलनेत कमकुवत असलेल्या दक्षिण कोरियाकडून जर्मनीला पराभव पत्करावा लागला.

या विश्वचषकात सर्वाधिक कामगिरी जर कोणत्या संघाची ढासळली असेल तर तो संघ म्हणजे जर्मनी. म्युलर,ओझील आणि ज्याला संघाची अभेद्य भिंत म्हणून ओळखले जाते त्या कर्णधार म्यॅन्युअल नॉयरच्या नेतृत्वाखाली खेळणारा जर्मनीची संघ ढासळला. फुटबॉल जगतात जो केंद्रबिंदू आहे, ज्याच्या अफाट वेगाने सगळेचथक्क होतात, त्या रोनाल्डोच्या एकट्याच्या जीवावर पोर्तुगाल संघदेखील जास्त मजल मारू शकला नाही. रोनाल्डोची बायसिकल पोर्तुगालला फायनलपर्यंत नेण्यात अपयशी ठरली. उरूग्वेच्या सांघिक कामगिरीपुढे रोनाल्डो दुबळा पडला आणि त्यांना साखळी फेरीत १-२ असा पराभव पत्करावा लागला. सुवारेझ,कवानी,हिमिनेझ यांच्या एकत्रितकामगिरीमुळे उरूग्वेने विजयी मार्गक्रमण केले. स्पेनशी सामना बरोबरीत सुटल्यानंतरही पोर्तुगालच्या चाहत्यांना आशा कायम होत्या. स्पेनशी झालेल्या सामन्यातही तिन्ही गोल रोनाल्डोने केले होते. त्यामुळे त्यावेळीही त्यांच्या सांघिक कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले.

- Advertisement -

बाद फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. २०१० चाजगज्जेता संघ असलेल्यास्पेनलाही बाद फेरीत यजमान रशियाकडून हार पत्करावी लागली. ’अपने घर मे सब शेर होते है’ असे असले तरी फिफा क्रमवारीत ७० व्या स्थानावर असणार्या रशियाची ही कामगिरी जबरदस्त होती. नेयमार, मार्सेलो, जिसस कुटिन्हो यांसारख्या दर्जेदार खेळाडूंचा संघ असलेला तसेच आतापर्यंत विक्रमी ५ वेळा फुटबॉल विश्वविजेतेपद मिळवणारा ब्राझीलदेखील एकदाही विजेतेपद न मिळवणार्या बेल्जियमकडून पराभूत झाला. इंग्लंड संघाने चांगली मजल मारली, परंतु क्रोएशियाच्या सांघिक कामगिरीपुढे त्यांना शरण जावे लागले. एकंदरीत फिफा विश्वचषक स्पर्धेचा आढावा घेता फुटबॉलच्या मैदानावरील आजवरबलाढ्य असलेल्याजर्मनी, स्पेन, इंग्लंड, ब्राझील, पोर्तुगाल यांसारख्या संघांनामानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.

तर क्रोएशिया,रशिया,बेल्जियमसारख्या तुलनेने कमी ताकदीच्या संघांनी सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करताना फुटबॉल स्पर्धेला नवी दिशा दाखवण्याचा पराक्रम केला. फ्रान्सची जरी बलाढ्य संघांमध्ये गणना होत असली तरी सांघिक कामगिरी ही त्यांच्या संघाची खरी ताकद होती. बचावफळी आणि आघाडीच्या ग्रिझमन,एम्बापेने केलेल्या आक्रमक कामगिरीमुळे त्यांनी जेतेपदाला गवसणी घातली.

- Advertisement -

जागतिक स्पर्धांत उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेल्या लहान संघांसाठी क्रोएशिया, बेल्जियम आणि रशिया हेसंघ प्रेरणादायी आहेत. इतकी वर्षे खेळणारे संघ आणि त्यांच्या बलाढ्य खेळाडूंशी दोन हात करत स्पर्धेत विजय मिळवण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली आहे. जागतिक फुटबॉलमध्ये आपले अस्तित्व शोधू पाहणाऱ्या भारतासारख्या देशासाठीही हीदिशादर्शक अशी स्पर्धा होती. क्रोएशिया,बेल्जियम अगदी रशिया, मग आम्ही का नाही? ही भावना देशाच्या तरूण पिढीमध्ये रूजणे गरजेचे आहे. तशी जागरूकता सरकारनेदेखील दाखवणे गरजेचे आहे. जागतिक पटलावर आपली नवी ओळख निर्माण करण्याची प्रत्येक देशाची महत्वाकांक्षा असते. त्यासाठी अनेक हात, अनेक मने एकत्र येतात. तेव्हा कुठे चमचमताचषक दिमाखात उंचावला जातो! काही लाख लोकसंख्या असलेल्या क्रोएशियासारख्या देशाने बलाढ्य संघांना टक्कर देण्याचं धाडस दाखवलं आणि मातही दिली. ’तुम्हीही हे करू शकता’ हा नवा, आश्वासकमंत्र त्यांनी तुमच्या-माझ्यासारख्याहरेकालादिलाय…


– रोशन चिंचवलकर
(लेखक ’आपलं महानगर’चे प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -