घरताज्या घडामोडीमास्क न घालणं ४ पोलिसांना पडलं महागात, केलं निलंबित

मास्क न घालणं ४ पोलिसांना पडलं महागात, केलं निलंबित

Subscribe

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक ठिकाणी मास्क घालणं सक्तीचं केलं आहे. पण काही जण या नियमाचे पालन करताना दिसत नाही आहेत. त्यामुळे अशा लोकांवर सध्या कारवाई होताना दिसत आहे. दरम्यान आतापर्यंतची मास्क सक्तीसंदर्भातील मोठी कारवाई करण्यात आली आहे. मास्क न घातल्यामुळे ४ पोलिसांना निलंबित केल्याचे समोर आले आहे. लातूरच्या गातेगाव पोलीस ठाण्याचे हे पोलीस आहेत. पोलिसांच्या विश्रामगृहात बेशिस्त वर्तन केल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

डीएसपी निखिल पिंगळेंच्या अचानक भेटीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मास्क सक्तीसंदर्भात सर्वसामान्यांना जे नियम आहे तेच पोलिसांसुद्धा आहेत. त्यामुळेच मास्क न घातल्यामुळे ४ पोलिसांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या कोरोनाच्या काळात मास्क घालणं अनिवार्य आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील सतत नागरिकांना मास्क घालण्याचे आवाहन करित आहेत.

- Advertisement -

दरम्यान राज्यात काल दिवसभरात ५ हजार ५०५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १२५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख ९८ हजार १९८वर पोहोचला असून यापैकी आतापर्यंत ४४ हजार ५४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल लातूर मध्ये ३२ नवे रुग्ण आढळले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर लातूर मनपामध्ये १७ नवे रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – जळगावाचे माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलाचा खून

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -