घरमहाराष्ट्रकमानींच्या संख्येबाबत सभ्रम

कमानींच्या संख्येबाबत सभ्रम

Subscribe

पुणे विभागातील बातम्या वाचा एका क्लिकवर ....

पुणे शहरात गणेशोत्सवात जमिनीपासून साडेपाच फुट उंचीवर बॉक्स कमानी उभारण्यास पोलिस प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र एका मंडळाने जास्तीत जास्त किती कमानी उभ्या कराव्यात याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कमानींच्या संख्येबाबत सभ्रम कायम आहे.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत शहरातील प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलिस आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस संपर्कमंत्री गिरीश बापट ,महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालिका आयुक्त सौरभ राव, अप्पर पोलिस आयुक्त रविंद्र सेनगांवकर, वाहतुक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे आदी उपस्थित होते. गणेश मंडळांचे उत्पन्न कमानींवरील जाहीरातींवर अवलंबून असल्याने बॉक्स कमानींना परवानगी द्या, कमानींची संख्या मागील वर्षी जेवढी होती तेवढीच ठेवावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केल्या. संपर्कमंत्री बापट म्हणाले, पोलिसांच्या सुरक्षेचा आम्ही आदर करतो, पोलिस आक्षेप घेतील तेथे कमानी उभा केल्या जाणार आहेत. मात्र उत्पन्नाचे साधन कमी करू नये. माणसाच्या उंचीपेक्षा थोडे जास्त उंचीवर कमानी उभारू, सीसीटिव्ही, कार्यकर्ते यांची व्यवस्था करून दिवसातून दोन वेळा कार्यकर्ते कमानीची तपासणी करतील, अशी ग्वाहीही बापट यांनी दिली. गणेशोत्सव दारू आणि डॉल्बीमुक्त करावा. यासंदर्भात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. या लोकांवर पोलिसांनी बिनधास्त कारवाई करावी, त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. जे हस्तक्षेप करतील, त्यांची नावे पोलिसांनी जाहीर करावीत. मंडळांनीही या दोन गोष्टी उत्सवापासून दूर ठेवाव्यात असे आवाहन बापट यांनी केले.

- Advertisement -

संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली कार्यन्वित

पुणे | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने बांधकाम परवानगी प्रक्रिया सुकर आणि पारदर्शक करण्यासाठी संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली पूर्णपणे कार्यन्वित करण्यात आली आहे. ऑनलाईन प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यत बांधकाम परवानगी प्रक्रीयेसाठी वास्तुविशारद, अभियंता, पर्यवेक्षक या २५० जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. बांधकाम परवानगी नकाशे आणि बँक चलन हे डिजिटल स्वाक्षर्‍यांचा वापर करून केले जात आहेत. तसच नागरिकांना ई-मेल आणि मोबाईलवर माहिती दिली जात आहे. या प्रणालीमध्ये ‘कलर-कोडींग स्कीम’चा वापर आहे, ज्यामुळे वास्तुविशारदांना नकाशे बनविणे अतिशय सोपे आहे. OBPAS द्वारे सर्व चलन ऑनलाईन पद्धतीन भरता येत आहेत. पीएमआरडीएच्या अस्तित्वात असलेला जमीन वापर प्रणालीशी या नवीन बांधकाम परवानगी प्रणालीला जोडण्यात आल आहे. या संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरीता www.pmrda-obpas.com हे पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे किरण गिट्टे यांनी सांगितले.


गुंडाला अटक; दोन पिस्तुलं जप्त

पुणे | बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्याप्रकरणी महाकाली टोळीतील एकाला निगडी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे असा एकूण 91 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई निगडी मधील ट्रान्सपोर्टनगर येथे करण्यात आली.साजन मन्नु मेहरा (वय 25, रा. महात्मा गांधीळ, देहूरोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील ट्रान्सपोर्टनगर येथे पीएमपीएमएल च्या भिंतीजवळ एकजण संशयितरित्या थांबलेला आढळून आला. याबाबत माहिती मिळताच निगडी पोलिसांच्या तपास पथकाने सापळा रचून साजन याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसे आढळली.

- Advertisement -

चोरीच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

police caught guy who sent obscene message to actressपुणे । चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला चाकण पोलिसांनी जेरबंद केले आहे. ही घटनापहाटे तीनच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत घडली.सुनील नितीन दाभाडे (वय 25, रा. कोटेश्वरवाडी, तळेगाव), परशुराम शंकर केसापुरे (वय 25, रा. समता कॉलनी, वराळे स्टेशन, ता. मावळ), राजू दत्तू मराठे (वय 22), हृषीकेश विलास दाभाडे (वय 22, दोघे रा. माळवाडी, ता. मावळ) आणि अन्य एक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत. चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निघोजे गावात चाकण पोलीस मंगळवारी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी निघोजे गावात पाच जणांचे टोळके एक टेम्पो घेऊन संशयितरित्या उभारलेले दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी सर्वजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सुनील याच्या कमरेला चाकू, परशुराम याच्या खिशामध्ये मिरची पूड असे साहित्य मिळाले. दरम्यान तिघेजण पळून गेले. ताब्यात घेतलेल्या दोघांकडे कसून चौकशी केली असता ते चोरी करण्याच्या उद्देशाने उभारले असल्याचे त्यांनी कबूल केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.


निसर्गाची कमीत कमी हानी करत केलेला विकास खरा – डॉ. माधव गाडगीळ

पुणे । चुकीच्या माहितीच्या आधारे आणि ठेकेदारांचे भले व्हावे म्हणून प्रकल्प रेटणे, खूप उंच आणि उभ्या उतारावर धरण बांधणे आणि विज्ञानाचा विपर्यास करून विकास साधताना मानवी व निसर्ग संपदेचा विचार न करणे अशा दृष्ट प्रवृत्तींच्या थैमानातून केरळची वाताहत झाली आहे. मोठ्या इमारती, रस्ते आणि धरणे म्हणजेच विकास असा समज झाला आहे. हा मानवनिर्मित कृत्रिम विकास झाला. निसर्गाची कमीत कमी हानी करत केलेला विकास खरा! असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले. देशात लोकशाही डावलून आणि घटनेच्या विरोधात जाऊन प्रकल्प लादले जात आहेत. प्रकल्पांमध्ये सामान्य आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग डावलला जात आहे, अशी टीका जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केली. वनराई संस्थेच्या वतीने आयोजित “एक महिना एक व्याख्यान” उपक्रमांतर्गत ’आज केरळ! उद्या कोकण?’ या विषयावर डॉ. गाडगीळ बोलत होते. यावेळी वनराईचे रवींद्र धारिया उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनराई मासिकचे संपादक अमित वाडेकर यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -