घरठाणेगणेश नाईक यांची अटक अटळ

गणेश नाईक यांची अटक अटळ

Subscribe

दोन्ही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले

अत्याचार आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी दाखल असलेल्या नेरूळ आणि सीबीडी पोलीस ठाण्यांतील दोन्ही गुन्ह्यांत आमदार व माजी मंत्री गणेश नाईक यांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने शनिवारी फेटाळले. यावेळी त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी सात दिवस अटक करू नये, अशी मागणी केली असता ती मागणीही अमान्य केल्याने आमदार गणेश नाईकांवर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होऊ शकते.

गणेश नाईक यांच्यावर नेरूळ पोलीस ठाण्यात दीपा चौहान नावाच्या महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला, तर सीबीडी पोलीस ठाण्यात बंदुकीने धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यांप्रकरणी ठाणे न्यायालयात नाईक यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्या दोन्ही गुन्ह्यांत दोन्ही बाजूंच्या वकिलांनी बाजू मांडली होती. त्या अर्जावरील सुनावणीला दोन वेळा तारीख पे तारीख पडली होती.

- Advertisement -

शनिवारी अखेर ठाणे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी गणेश नाईक यांचे दोन्ही अर्ज फेटाळून लावले. तसेच त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी सात दिवस अटक करू नये, अशी मागणी केली. ती मागणीही न्यायालयाने अमान्य केली. त्यामुळे गणेश नाईकांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. आता नाईकांना नवी मुंबईतील नेरूळ की सीबीडी पोलीस पहिले अटक करतात हे पाहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -