घरमहाराष्ट्रगणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा शोध सुरु

गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा शोध सुरु

Subscribe

गणपतीपुळाच्या समुद्रात तीन पर्यटक बुडाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. यामध्ये एकाचा शोध सुरु आहे.

पर्यटनासाठी कोल्हापूरमधून येणारे तीन पर्यटक गणपतीपुळे समुद्रात बुडाल्याची घटना आज पहाटे घडली आहे. यामध्ये दोन महिलांचा तर एका तरुणाचा समावेश आहे. त्यातील दोन महिलांचे मृतदेह सापडले असून एक पुरुष बेपत्ता आहे. सध्या बेपत्ता पुरुषाचा शोध घेण्यात येत आहे.

नेमके काय घडले?

कोल्हापुरातील शहरात कसबा बावडा येथे राहणारे आठ पर्यटक गणपतीपुळे येथे आले होते. हे पर्यटक आज पहाटे समुद्रात पोहोण्यासाठी जात असताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी जाण्यास विरोध केला. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या म्हण्याला विरोध करत हे पर्यटक पाण्यात उतरले. यामध्ये तीन जण बुडाल्याची घटना घडली आहे. तर एका तरुणीचा जीव वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -