घरमहाराष्ट्रकचरा डेपोतील कचर्‍याच्या ढिगार्‍यांना भीषण आग

कचरा डेपोतील कचर्‍याच्या ढिगार्‍यांना भीषण आग

Subscribe

कोथरूड येथील तीन ते चार एकरात पसरलेल्या कचरा डेपोतील कचर्‍याच्या ढिगार्‍यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. मागील दोन दिवसांपासून सतत कचरा डेपोमध्ये आग लागत असून धुमसणारे ढिगारे असल्याने आग पसरत असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

कोथरूड येथे तीन ते चार एकरवर पसरलेला कचरा डेपो आहे. या कचरा डेपोमध्ये कच-याचे ढिगारे करण्यात आले आहेत. यातील ढिगार्‍यांना मागील दोन दिवसांपासून किरकोळ आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. वेळोवेळी अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, शनिवारी सकाळीदेखील येथे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या कोथरूड फायर स्टेशनच्या अधिकार्‍यांनी ही आग आटोक्यात आणली होती. मात्र तरीही सायंकाळी पाचनंतर या परिसरात आग लागल्याची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली.

- Advertisement -

यापूर्वी येथे आग लावून ढिगारे जाळण्यात आले असल्याचे चित्र अग्निशमन दलाला दिसून आले आहे. मात्र शनिवारी सायंकाळी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून संपूर्ण कचरा डेपोमध्ये असलेल्या ढिगार्‍यांमधून आग धुमसत असल्याने आग आटोक्यात आणण्याच्या कामाला वेग येत नाही. त्यासोबत चालक नसल्याने अतिरिक्त वाहने व टँकर पाठवणे शक्य नसल्याचे मुख्य केंद्रातून सांगण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोथरूड व पाषाण अग्निशमन केंद्रातील दोनच वाहने आणि कर्मचार्‍यांकडून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -