घरमुंबईलोकलमध्ये चोरी करणार्‍या टोळीला अटक

लोकलमध्ये चोरी करणार्‍या टोळीला अटक

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वी बांद्रा स्थानकात रेल्वे प्रवासादरम्यान लुटणार्‍या फटका गँगची दहशत सुरू असताना आता पुन्हा एकदा लोकलमध्ये चोरी करणार्‍या टोळक्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. २ महिन्यांपूर्वी बांद्रा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर १६ हजार किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल चोरीला गेला होता. याप्रकरणी बांद्रा लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता एक महिला त्या परिसरात संशयास्पद फिरताना दिसली. खबर्‍यांकडुन माहिती मिळवली असता ती अट्टल चोरटी असून अंधेरी पोलिसांनी तिला चोरीच्या गुन्ह्यात अटक केली असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासादरम्यान सर्व गोष्टींची पडताळणी केली असता ती सध्या भायखळा महिला कारागृहात शिक्षा भोगत असल्याचे समोर आले.

त्यानुसार पोलिसांनी वरिष्ठांची परवानगी मिळवून तिला ताब्यात घेतले आणि चौकशी केली असता आतापर्यंत तिने अनेक मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. चोरी केलेले मोबाईल अन्य साथिदारांकडे असल्याचे सांगताच माहितीनुसार पोलिसांनी अन्य तिघांना अटक केलेली आहे. या चोरट्या महिलेचे नाव मुस्कान मेहबुब शेख असे असून अटक करण्यात आलेल्या अन्य तीन आरोपीमंध्ये सुफियान मुदलीयार दळवी, असिफ नुरनवी खान , तन्वीर मेहमुद शेख यांचा समावेश आहे.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यांपूर्वी चोरी झालेल्या १६ हजार रुपये किंमतीच्या एका मोबाईल चोरीच्या प्रकरणामुळे आणखी ९ प्रकरणांची उकल करण्यात बांद्रा पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून एकूण १० मोबाईल हस्तगत करण्यात आले असून त्यांची किंमत जवळपास १ लाख ७०० रुपये इतकी आहे.

बांद्रा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केलेल्या तपासत या चारही अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -