घरठाणेठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी महिला आयोगाची नोटीस

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी महिला आयोगाची नोटीस

Subscribe

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणाची आता महिला आयोगाने दखल घेतली आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या प्रकरणाची आता महिला आयोगाने दखल घेतली आहे. मारहाण प्रकरणी नोटीस जारी करत ठाणे पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत. (Women commission notice in Thackeray group worker Roshni Shinde beating case vvp96)

‘फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून श्रीमती रोशनी शिंदे याना जमावाने मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारीत झाली आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे’, असेही या नोटीसमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

महिला आयोगाच्या नोटीसमध्ये काय?

महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(५) (फ) (एक) (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.

- Advertisement -

फेसबुक पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून श्रीमती रोशनी शिंदे याना जमावाने मारहाण केल्याची घटना वृत्तवाहिन्यांवरून प्रसारीत झाली आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरुपाचे असल्याने या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२(२ ) व ५२(३) नुसार आपणास निर्देश देण्यात येत आहेत की. दि. ०६.०४.२०१३ रोजी दुपारी १२.३० वाजता उपरोक्त प्रकरणी केलेल्या कार्यवाहीच्या अहवालासह व्यक्तिशः उपस्थित रहावे.

ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीनंतर बुधवारी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर मोर्चा काढला. तसेच, या मोर्चाच्या माध्यमातून या घटनेचा विरोध केला.


हेही वाचा – ‘रोशनी तुमची बहीण आहे, तिचा FIR नोंदवायला सांगा’, शिंदेंच्या ‘त्या’ पत्रावर आव्हाडांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -