घरमहाराष्ट्रGood News : परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी पोलीस पाल्यांना 10 टक्के जागा राखीव;...

Good News : परदेशी भाषा प्रशिक्षणासाठी पोलीस पाल्यांना 10 टक्के जागा राखीव; लोढा यांची माहिती

Subscribe

मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून वरळी येथील मुंबई पोलीस कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेंटर एल विभागात आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन लोढा यांच्या हस्ते झाले.

मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राच्या मार्फत देण्यात येणाऱ्या परदेशी भाषेच्या प्रशिक्षणासाठी पोलिसांच्या पाल्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (1 डिसेंबर) येथे दिली. (Good News 10 percent seats reserved for police children for foreign language training Lodhas information)

मुंबई पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी प्रमोद महाजन कौशल्य युवा विकास योजनेच्या माध्यमातून वरळी येथील मुंबई पोलीस कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेंटर एल विभागात आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन लोढा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी बोलताना लोढा म्हणाले. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम राबविण्यात येत आहे. फक्त कौशल्य शिकविण्यावर नाही तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये अजून बदल करता येतील. एखाद्या प्रशिक्षणार्थीला स्वयंरोजगार करावयाचा असल्यास त्याचे मार्गदर्शन करण्यात येईल. सरकारी योजना आणि त्याचे लाभ कसे घ्यायचे याचे देखील मार्गदर्शन करता येईल.

- Advertisement -

हेही वाचा : MLA DISQUALIFICATION : पक्षाची खरी घटना कोणती? प्रभूंची सुनावणी लांबवण्याचा डाव; सामंताचा आरोप

तर केंद्र सरकारमार्फत देशात कौशल्य उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा उपक्रम आहे. मुंबई पोलिस आणि त्यांच्या कुटुंबीयांकरिता सुरू केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून काही तरी करू इच्छिणाऱ्यांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महिलांना घरची जबाबदारी सांभाळत असतानाही एखादा व्यवसाय करता येवू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची संधी मिळेल. कौशल्य विकासाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तू आपल्याच पोलिस कुटुंबाना विक्री करण्यासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध देण्याबरोबरच तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण घेवून व्यवसाय करण्यासाठी पोलीस आयुक्ताच्या निधीतून मदत करण्यात येईल, असे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Manoj Jarange : ‘तुम्ही आमच्याशी दगाफटका कराल तर याद राखा’; जरांगेचा सरकारला इशारा

या कार्यक्रमाला विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, सशस्त्र पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह, पोलीस सहआयुक्त एस. जयकुमार, पोलीस उपायुक्त प्रज्ञा झेडगे, अस्मिता संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र छांजड यासह पोलीस आणि पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -