घरताज्या घडामोडीगोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा सुरक्षा रक्षक नाकारला, पवार कुटुंबियांसह सांगलीच्या एसपींवर हत्येच्या...

गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा सुरक्षा रक्षक नाकारला, पवार कुटुंबियांसह सांगलीच्या एसपींवर हत्येच्या कटाचा आरोप

Subscribe

भाजप नेते आणि विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा सुरक्षा रक्षक (बॉडीगार्ड) नाकारला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबिय तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सांगलीचे एस पी हे माझ्या हत्या करण्याच्या कटात सामील असल्याचा घणाघाती आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. पडळकरांनी नोव्हेंबर महिन्यातील हल्ल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून पवार कुटुंबीयच आपल्या हत्येच्या कटात सामील असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॉडीगार्ड नाकारला असून पवार कुटुंबीयांवर हत्येच्या कटाचा आरोप केला आहे. पडळकर यांनी एक हल्ल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा हल्ला पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुनियोजितपणे करण्यात आला असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे. पडळकरांनी हा स्वतःवर झालेल्या हल्ला असल्याचे सांगितले आहे. हल्ला सुनियोजित असून आटपाटी पोलीस चौकीच्या समोर झाला आहे.

- Advertisement -

गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी असे म्हटलं आहे की, शेअर केलेल्या व्हिडीओतील हल्ला हा सुनियोजीत होता हे तुम्हाला दिसत असेल. माजी गाडी ज्या दिशेने जात होती त्याच्या विरुद्ध दिशेने २०० ते ३०० लोकांचा जमाव येत होता. माझ्या गाडीवर दगड फेकायची आणि नंतर गाडीचा वेग कमी झाल्यावर ट्रक अंगावर घालायचा असा सुनियोजीत कट रचण्यात आला होता. पोलीसच या हल्ल्याचे चित्रीकरण करताना दिसत आहेत. हा सगळा कट पोलिसांच्या संरक्षणात घडवण्यात आला असल्याचा आरोप पडळकर यांनी केला आहे.

पवार कुटुंबियांवर पडळकरांकडून हत्येच्या कटाचा आरोप

या हल्ल्याच्या कटात जिल्हायाचे एस.पी दिक्षित कुमार गेडाम, ॲडीशनल एस.पी मनिषा डुबुले आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयंत पाटील पुर्णपणे सामिल आहेत. यांनी या कारवाईच्या नावाखाली माझ्या बॅाडीगार्डलाच संस्पेंड केलं आणि उलट माझ्यावरच ३०७ अंतर्गत गुन्हा दाखलं केला. एसपी आणि ॲडीशनल एसपी यांच्यावरचा विश्वास उडाल्यामुळे मी बॅाडीगार्ड न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. कारण रक्षकच जर भक्षकात सामील असतील तर त्यांच्यावरती कसा विश्वास ठेवायचा. पण एकच सांगतो मी माझा पवार-पाटलांविरूद्धचा लढा चालूच ठेवणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : shirdi : शिर्डीत साई भक्तांसाठी रात्री ९ वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी बंद, नवीन नियमावली जारी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -