घरताज्या घडामोडीMaharashtra Assembly speaker election: विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly speaker election: विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील, फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्षांची निवडणूक राज्याच्या हिवाळी अधिवेशनात होणार आहे. २७ आणि २८ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वर्षांमधील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. या पंतप्रधानांच्या या निर्णयाचे फडणवीसांनी स्वागत केलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, राज्यपालांचे अधिकार किंवा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निश्चितपणे राज्यपाल घेतील. पण या संदर्भात आम्ही जे काही बदल केले आहेत ते बदल भारतीय संविधानाच्या आर्टीकलशी सुसंगत वाटत नाहीत. अशा प्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिक महत्त्व द्यायचे हे काही योग्य नाही म्हणून आम्ही याचा विरोध केला आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. सुशासन दिनानिमित्त मोदींनी चांगला निर्णय घेतला आहे. ६० वर्षाच्या वरच्या लोकांना बूस्टर डोस आणि १५ ते १८ अशा तरुण युवांना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. याचा फार फायदा होईल आणि ओमिक्रॉनच्या संकटातून या लोकांची सुटका करता येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राज्य सरकारने पहिल्याच दिवशी अधिवेशन गुंडाळले

आमदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्य सरकार अधिवेशन गुंडाळणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचे राहिले आहे. अधिवेशन गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार.. पहिल्या दिवशीच अधिवेशन गुंडाळले आहे. पाच दिवसांचे अधिवेशन ठेवणं म्हणजे गुंडाळल्यासारखेच असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा सुरक्षा रक्षक नाकारला, पवार कुटुंबियांसह सांगलीच्या एसपींवर हत्येच्या कटाचा आरोप

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -