घरताज्या घडामोडीराज्य सरकार MPSC बाबत धोरणात्मक निर्णय घेणार की तोंडाला पानं पुसणार, पडळकर...

राज्य सरकार MPSC बाबत धोरणात्मक निर्णय घेणार की तोंडाला पानं पुसणार, पडळकर यांची टीका

Subscribe

सरकारमधून घराकडे काय नेता येईल, पैसे कसे खाता येती, लुबाडता कसं येईल याच्यापलिकडे यांचे कुठलंही लक्ष नाही

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुण्याती एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. या एमपीएससी विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी आंदोलन केलं होतं. एमपीएससी विद्यार्थ्यांना ताबडतोब नियुक्तीपत्र दिलं पाहिजे सगळी मुलांमध्ये ताण निर्माण झाला आहे. मुला-मुलींची लग्न व्हायची बाकी आहेत तसेच समाज व्यवस्थेमध्ये या मुलांना अपमानित व्हाव लागत आहे. त्यांचे १ वर्ष आणि २ वर्ष वाया घालवल्यामुळे ते जेव्हा सेवानिवृत्त होतील त्यावेळी अधिक अडचणी निर्माण होणार असून त्यांचे नुकसानही होणार आहे. तेव्हा वेळ न घालवता राज्य सरकारने १३ जुलैला नियुक्ती पत्र देण्याची विनंती गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राज्य सरकार मुलांच्या जीवनाशी खेळतंय

राज्य सरकार खोटं बोललं आहे. सभागृहामध्ये अजित पवार यांनी म्हटलं आहे की, ३१ जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व जागा भरू यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी म्हटलय की, एमपीएससीचे जे सदस्य पद रिक्त आहेत ४ ते भरू यामुळे सरकार नुसतं गोलमाल करत आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, एमपीएससीबाबत पुढील नियोजन काय? परीक्षा कधी घेणार? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पीएसआयच्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा ४ ऑगस्ट २०१९ रोजी झाली आहे. त्यांनाही अजून बोलवले नसून त्यांचे पुढचे नियोजनही दिलं नाही आहे. राज्य सरकार मुलांच्या जीवनाशी खेळत आहे. एमपीएससी सारखी स्वायत्त संस्था आहे याच संस्थेकडून अशी अपेक्षा नाही. उद्या हीच मुल राज्यातील तालुके सांभाळणार आहेत जर प्रशासनाने त्यांच्यावरच अन्याय केला तर या मुलांच्या मनामध्ये काय परिणाम होईल असे मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

मंत्र्यांना स्वतःच्या मुलांची काळजी

सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा सरकारमधून घराकडे काय नेता येईल, पैसे कसे खाता येती, लुबाडता कसं येईल याच्यापलिकडे यांचे कुठलंही लक्ष नाही आहे. मंत्र्यांना आपल्या मुलांची काळजी आहे मग या मुलांचे कोण बघणार आहे. स्वप्निल लोणकरने आत्महत्या केल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मागणी केली की त्याच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत करावी यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक विचार करु अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु अद्याप त्यांना मदत दिली नाही त्याचे आई-वडील गेल्यावर मदत करणार का? असा सवालही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -