घरमहाराष्ट्रनाशिकच्या गिर्यारोहकाने शोधला अप्रकाशित किल्ला

नाशिकच्या गिर्यारोहकाने शोधला अप्रकाशित किल्ला

Subscribe

नगरच्या पारनेर तालुक्यात इतिहासाच्या खूणा, चढाई मार्गावर सापडल्या तटबंदी चिरे, पाण्याचे टाके

ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांचा खजिना असलेल्या नाशिक विभागाच्या यादीत आता आणखी एका किल्ल्याचा समावेश झाला आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात आजवर अप्रकाशित असलेला हा किल्ला नाशिकचे गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी शोधला.

म्हसोबा झाप म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका लहान वस्तीनजीक हा भोरवाडी किल्ला आहे. हरिश्चंद्र गडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेने जाते. कुलथे यांनी ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करत असताना या भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोटा या गावापासून पूर्वेकडे म्हसोबा झाप या गावाची भोरवाडी वस्ती आहे. स्थानिक रहिवाशी टोकदार निमुळत्या आकारामुळे या किल्ल्याला चुचुळा म्हणतात. भोरवाडी गावातून चढाईचा मार्ग आहे. चढाई मार्गात खडकात पायर्‍या कोरलेल्या दिसतात. तसंच, तटबंदीचे चिरे, माथ्यावर घोदीव टाके आहेत.

- Advertisement -

 

Bhorwadi Fort1

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -