घरमहाराष्ट्रसत्तास्थापनेची रांगोळी गोपीनाथ गडावर

सत्तास्थापनेची रांगोळी गोपीनाथ गडावर

Subscribe

आठवण साहेबांची आणि कमळ धनुष्यबाणावर

भाजप आणि शिवसेनेमधील सत्तास्थापनेचा तिढा निकाल लागून 12 दिवस उलटून गेलेत तरी आणखी सुटता सुटत नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारी (आज) मराठवाडा दौर्‍यावर आहेत. परळीमधल्या स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत.

मात्र त्याअगोदर गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी विशेष रांगोळी काढण्यात आली आहे. रांगोळीमध्ये धनुष्यबाणावर कमळ, अशी रांगोळी रेखाटण्यात आली आहे. या रांगोळीवरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. निकाल लागल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू आहे. फुलांच्या रांगोळीच्या बाजूला ’आठवण साहेबांची’ असं लिहिलं आहे.

- Advertisement -

शिवसेना भाजपमधला संघर्ष आणि रांगोळीमध्ये ’आठवण साहेबांची’, असे लिहिणे याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाड्यात आहेत. याचदरम्यान ते गोपीनाथ गडावर जाणार आहेत.तसेच यावेळी खासदार प्रीतम मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या दोघीही परळीत नसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -