घरमहाराष्ट्रकाँग्रेसच्या ‘हाता’ला शिवसेनेच्या ‘पंजा’ची साथ

काँग्रेसच्या ‘हाता’ला शिवसेनेच्या ‘पंजा’ची साथ

Subscribe

बाळासाहेबांचे ‘ते’ व्यंगचित्र व्हायरल

राज्यात भाजप-शिवसेनेतील दिलजमाई अद्यापही झालेली नाही. दुसरीकडं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हात आणि वाघाच्या पंजाचे व्यंगचित्र व्हायरल होत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९८० मध्ये मार्मिकमध्ये एक व्यंगचित्र काढलं होते. ते व्यंगचित्र पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. १९८०मध्ये बाळासाहेबांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर १२ जून १९८० च्या मार्मिकच्या अंकात काँग्रेसचा ‘हात’ आणि शिवसेनेचा वाघाचा पंजा सोबत असल्याचे दाखवले आहे.

सत्तेच्या समसमान वाटपावर भाजपाकडून कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका घेतली घेतली जात आहे. तर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तेचे समसमान वाटप व्हायला हवे, अशी मागणी केली आहे. त्यावरून दोन्ही पक्षातील चर्चा थांबली असून, नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेकडे १७० आमदारांचे संख्याबळ असून, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा केला. त्यानंतर शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पाठबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

- Advertisement -

काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष वेगळ्या विचारांचे असले तरी सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देऊ शकते. कारण बाळासाहेब ठाकरे यांनीदेखील त्याकाळी इंदिरा गांधी यांना समर्थन दिले होते. परंतु आता परिस्थिती अगदी उलटी आहे. शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यकता भासणार आहे. तो मिळणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -