घरमहाराष्ट्रSwimming Pool : स्विमिंग पूलमध्ये बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; गोरेगावच्या शाळेतील...

Swimming Pool : स्विमिंग पूलमध्ये बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; गोरेगावच्या शाळेतील घटना

Subscribe

मुंबईः स्विमिंग पूलामध्ये बुडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथील गोकुळधाम, यशोधाम स्कूलमध्ये घडली. शार्दुल संजय आरोलकर असे या मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यूला शाळेतील प्रशासनासह स्विमिल पूलमधील ट्रेनरच जबाबदार असल्याचे बोलले जाते. दुपारी घडलेल्या या घटनेने पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

संजय मधुकर आरोलकर हे बोरिवलीतील योगीनगर, शासकीय वसाहतीत राहत असून सध्या दिडोंशी कोर्टात कामाला आहे. त्यांना शार्दुल नावाचा एक चौदा वर्षांचा मुलगा असून तो सध्या गोकुळधाम येथील यशोधाम स्कूलमध्ये नववीत शिकत होता. स्कूलच्या गोकुळधाममध्ये एक स्विमिंग पुल असून तिथे तो सहा महिन्यांपासून पोहण्यासाठी जात होता. त्याचा बेसिक पोहण्याचा कोर्स सुरु होता. त्यासाठी तिथे चार स्विमिंग ट्रेनर कार्यरत असून ते ट्रेनिंगसह टिचिंगचे काम यशोधाम स्कूलच्या वतीने करत होते.

- Advertisement -

हेही वाचाःपाचवी ते आठवी पास होणं बंधनकारक; शालेय शिक्षण विभागाकडून कायद्यात सुधारणा

अशी घडली घटना

शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता त्यांची पत्नी स्नेहलता हिने त्यांना फोनवरुन शार्दुलला लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे संजय आरोलकर हे तिथे गेले. प्रकृती गंभीर झाल्याने शार्दुलला नंतर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तपासात शार्दुल हा स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचे प्रशिक्षण घेत असताना त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो बुडू लागला. हा प्रकार लक्षात येताच सागर नावाच्या ट्रेनरने त्याला पाण्याच्या बाहेर काढले. यावेळी त्याने उलटी केली. उलटीद्वारे त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी संजय आरोलकर यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. या संपूर्ण घटनेने शाळेतील संबंधित अधिकारी आणि स्विमिंग पूलमधील ट्रेनर जबाबदार असल्याचा आरोप होत असून चौकशीनंतर दोषींवर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

रिसॉर्टमधील तलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

जीम खतीब मनोर : चिल्हार -बोईसर रस्त्यावरील गुंदले गावच्या हद्दीतील मामाचा गाव नामक रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाला. बेशुद्धावस्थेत त्याला नागझरी नाक्यावरील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, परंतु उपचाराआधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नाताळ सुट्ट्या आणि नववर्ष साजरे करण्यासाठी मयत मुलाचे कुटुंबीय रिसॉर्टमध्ये आले होते. सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. रुद्र देविदास वाडकर (वय.09) असे मयत मुलाचे नाव असून तो डहाणू तालुक्यातील कासा गावाचा रहिवासी होता. रिसॉर्टमधील तरणतलावात लाइफ गार्ड नसल्याने मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली याआधी याच रिसॉर्टच्या मालकाचा तरण तलावाच्या उद्घाटन प्रसंगी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -