घरताज्या घडामोडीसंभाजी भिडेंवर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करावी - जयंत...

संभाजी भिडेंवर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करत कायदेशीर कारवाई करावी – जयंत पाटील

Subscribe

अमरावती जिल्ह्यांतील वडनेरा येथे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांकडून निषेध केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यांतील वडनेरा येथे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध अवमानकारक वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांकडून निषेध केला जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटरवरून संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. (government should immediately file a case against Sambhaji Bhide and take legal action says Jayant Patil)

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

“मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असे वक्तव्य केले आहे. भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केला आहे. अशाप्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलो आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य असे आहे. केवळ भारतच नाही तर जगभर गांधींच्या विचारांना आदर व सन्मान आहे. मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी”, असे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे?

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्‍यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्‍तव्‍य श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. गुरुवारी रात्री अमरावतीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले.

- Advertisement -

हेही वाचा – संभाजी भिडेंना ‘ते’ वक्तव्य भोवलं, काँग्रेसच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -