घरमहाराष्ट्र'सरकार औटघटकेचं असल्यामुळे बडबडत असतील'; फडणवीसांच्या 'त्या' दाव्यावर राऊतांचा टोला

‘सरकार औटघटकेचं असल्यामुळे बडबडत असतील’; फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचा टोला

Subscribe

मुंबई : 2019 साली राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजपाने (BJP) एकत्रित निवडणुका लढल्या, मात्र त्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये फिस्कटलं आणि राज्यात नव्या समीकरणांनी आकार घेतला. महाविकास आघाडीचं सरकार बनणार असल्याचं बोललं जात असतानाच अजित पवारांनी (Ajit Pawar) देंवद्र फडणवीसांसोबत (Devendra Fadnvis) पहाटे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने खळबळ उडाली होती. त्या घटनेची अद्याप चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांच्या (Sharad Pawar) संमतीनेच पहाटेचा शपथविधी (Morning oath) झाल्याचा मोठ दावा केला. यानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. (Governments must be grumbling because they are artificial sanjay Rauts attack on Fadnavis that claim)

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही आहे. त्यांचं सध्याचं सरकार औटघटकेचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मुदत निम्मी संपली आहे. त्यामुळे 100 टक्के त्यांचे सरकार पडणार आहे. त्यामुळे कदाचित ते झोपेत किंवा जागेपणी बडबडत असतील. त्यांच्याकडे फार लक्ष देऊ नका, असा जोरदार टोला संजय राऊत यांनी फडणवीसांना लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आंदोलन; कार्यकर्त्यांकडून किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

एक प्रयोग केला आणि तो फसला

संजय राऊत म्हणाले की, फडणवीस बोलत आहेत शरद पवारांनी अमुक केलं वगैरे. ठीक आहे ना. त्यात नवीन काय आहे? काय केल आहे शरद पवारांनी? आमच्याशी बोलत होते वगैरे सांगत आहेत. पण तुम्ही एक प्रयोग केला आणि तो फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. तो प्रयोग तुमच्या अंगाशी आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला.

- Advertisement -

सरकार बनलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले

राऊत म्हणाले की, डबल गेमची गोष्ट सोडा. महाविकास आघाडी एकत्र आली आणि सरकार बनलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांनी त्या सरकारला पूर्णपणे समर्थन दिलं हे सत्य आहे. त्यामुळे आता तुम्ही सकाळी कोणती शपथ घ्यायला सांगितली वगैरे तो तुमचा प्रश्न आहे. तुमचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे, असे स्पष्ट मत राऊतांनी यावेळी मांडले.

हेही वाचा – मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात; आरोप करत संजय राऊतांनी सरकारवर साधला निशाणा

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?

एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवर बोलताना पुन्हा एकदा मोठा दावा केला. ते म्हणाले की, आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात भाजपा-एनसीपीचं सरकार स्थापन केलं जाईल, असं ठरलं. सरकार कसं असेल याचा आराखडाही तयार झाला. अजित पवार आणि मी दोघं या सरकारचं नेतृत्व करणार हेही ठरलं आणि सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली असल्याचे फडणवीस म्हणाले.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -