घरमहाराष्ट्रराज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते - गुरू माँ कांचन गिरी

राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते – गुरू माँ कांचन गिरी

Subscribe

गुरु माँ कांचन गिरी आणि जगतगुरु सुर्याचार्यजी यांनी आज मुंबईत कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज आणि महंतांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंमध्ये बाळासाहेबांची छबी दिसते, अशी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे जे बोलतात ते करतात, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.

जो बोलण्यावर ठाम नाही, त्याच्यासोबत चर्चा करुन वेळ फूकट घालवत नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत जे त्यांच्या बोलण्यावर ठाम आहेत. राज ठाकरे यांना आधिपासून ओळखते. बाळासाहेब ठाकरे यांना भेटले होते. बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा राज ठाकरेंमध्ये दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवत आहेत. जो बोलण्यावर ठाम आहे तो राष्ट्राची सेवा करतो. जो बोलण्यावर ठाम नाही, निर्णय घेताना ठाम नाही तो देशसेवा करु शकत नाही. आपल्या पदासाठी, आपल्या सरकारसाठी राष्ट्राला धोक्यात घालत असाल, त्या लोकांना आम्ही कधीही सहकार्य करणार नाही, असं गुरु माँ कांचन गिरी म्हणाल्या.

- Advertisement -

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीत अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज हे अयोध्येला जाणार आहेत.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -