घरमहाराष्ट्रHeat Wave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, तर विदर्भ, मराठवाड्यात...

Heat Wave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, तर विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

Subscribe

आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबई : हवामान खात्याकडून महाराष्ट्रात पुढील 24 तासात काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. आज हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवला आहे. (Heat wave likely in Mumbai Thane and Raigad rain likely in Vidarbha Marathwada)

मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे असून या काळात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड या भागात तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण राहणार आहे. मात्र 3 मेपासून राज्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आलं असून उन्हात बाहेर पडताना स्वत:ची काळजी घ्या असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

उत्तर कोकणातही उष्णतेची लाट (Heat wave also in North Konkan)

हवामान खात्याने उत्तर उत्तर कोकणातील काही भागात क्षेत्रात उष्णतेची लाटेची शक्यता वर्तविली आहे. कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. तर पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागातही दमट आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

- Advertisement -

विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता

दरम्यान, एकीकडे राज्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, मात्र दुसरीकडे राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -