घरताज्या घडामोडीMaharashtra Weather Forecast: मुंबईत पुढील चार दिवसांत धो धो पाऊस, राज्याला मोठा दिलासा

Maharashtra Weather Forecast: मुंबईत पुढील चार दिवसांत धो धो पाऊस, राज्याला मोठा दिलासा

Subscribe

राज्यात मागील (Maharashtra Weather Forecast) आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. परंतु आठवडाभरातच पावसाने उसंत घेतली. त्यानंतर मुंबईकरांना उकाड्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परंतु मुंबईत पुढील चार दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या २३ जून आणि २४ जूननंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांची उंचीही वाढत आहे. त्यामुळे मध्य भारतातील काही भागातून मान्सून परत येणार असून यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

मुंबईतील कुलाबा येथे 33.7 अंश आणि सांताक्रूझ येथे 33.9 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 2.2 अंशांनी अधिक होते. जूनच्या शेवटच्या आठ ते दहा दिवसांमध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात चांगला पाऊस असेल, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

सध्या पावसाची सरासरी ही मोठ्या प्रमाणावर तुटीची आहे. त्यामुळे पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल, असेही होसाळीकर यांनी सांगितले. शेतकरीही पावसाच्या आगमनाची वाट पाहत असल्याने पावसाची आकडेवारी, पावसाचे पूर्वानुमान पाहुन पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामानशास्त्र विभागानुसार मान्सून पश्चिम-मध्य व उत्तर-पश्चिम बंगालचा उपसागर तसेच कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार या राज्यांत दाखल झाला आहे.

- Advertisement -


हेही वाचा : Biparjoy Cyclone : राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -