घरक्राइमMPSC परीक्षेत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची हत्याच, पोस्टमार्टम रिपोर्टमधून निष्पन्न

MPSC परीक्षेत तिसऱ्या आलेल्या दर्शना पवारची हत्याच, पोस्टमार्टम रिपोर्टमधून निष्पन्न

Subscribe

दर्शना ही तिच्या मित्रासोबत मागील आठवड्यात सोमवारी (ता. 12 जून) तिचा मित्र राहुल राहुल याच्यासोबत राजगडावर गेली होती. त्यामुळे आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार राहुलनेच दर्शनाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पुणे : रविवारी पुण्यातील राजगडाच्या पायथ्य़ाशी दर्शना पवार नामक 26 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. दर्शना पवार ही MPSC परीक्षेत राज्यातून तिसरी आलेली विद्यार्थीनी असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी देखील तत्काळ या घटनेत कारवाई करत या हत्येचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला दर्शना पवार हिची हत्या झाली की तिने आत्महत्या केली याबाबत कोणालाच काहीच माहीत नसल्याने पोलिसांनी या प्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद कोली होती. परंतु आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार तिची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दर्शना ही तिच्या मित्रासोबत मागील आठवड्यात सोमवारी (ता. 12 जून) तिचा मित्र राहुल राहुल याच्यासोबत राजगडावर गेली होती. त्यामुळे आता पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार राहुलनेच दर्शनाची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Darshana Pawar, who stood third in the MPSC exam, was murdered, the post-mortem report revealed)

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात तरुणीचा संशयास्पद मृत्यू, राजगडाच्या पायथ्याशी आढळला मृतदेह

- Advertisement -

दर्शना पवार ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची तालुक्यातील होती. गेल्या काही वर्षांपासून ती स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. पुण्यात देखील तिने क्लास लावला होता. त्यानंतर ती गावी जाऊन सेल्फ स्टडी करत होती. तसेच तिने स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने यश मिळवले होते. त्यामुळे पुण्यातील एका अॅकडमीच्या वतीने तिचा सत्कार समारंभ होता. त्यानिमित्ताने ती 9 जूनला पुण्यात आली होती आणि नर्हे येथील एका मैत्रिणीकडे राहत होती. परंतु 12 जूनला तिने आपल्या मैत्रिणीला सिंहगड किल्ल्यावर ट्रेकींगसाठी जात असल्याचे सांगितले होते. कुटुंबाला देखील याबाबत तिने कल्पना दिली होती. मात्र, तिथे गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला आणि फोन बंद झाल्यामुळे तिच्या कुटुंबाने तीन दिवस तिचा शोध घेतला. पण ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटुंबाने सिंहगड रोड पोलिसांत ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर, त्यांनी तत्काळ शोधकार्य सुरू केले. त्यानंतर रविवारी (ता. 18 जून) राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडांमध्ये दर्शनाचा कुजलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळून आला. तिचा मोबाईल आणि इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तिच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि कुटुंबाने धाव घेत तिची ओळख पटवली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शना ही ट्रेकिंगला एकटी आली नव्हती. तिच्यासोबत तिचा मित्र राहुल हांडोरे हा देखील ट्रेकिंगला आला होता. हे दोघे 12 जूनला राजगडावर दुचाकीने गेले. साधारणतः सकाळी सव्वा सहा वाजताच्या सुमारास त्यांनी गड चढायला सुरुवात केली. पण त्यानंतर लगेच 10 वाजता राहुल हा एकटाच गडावरून खाली आला. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना तेथील एका हॉटेलमधून प्राप्त झाले आहेत. पण या घटनेनंतर राहुल हा बेपत्ता आहे. तर त्याचा नंबर हा बाहेरील राज्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचे राहुलने त्याच्या घरच्यांना कळवले आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता राहुलचा शोध घेण्यात येत आहे.

पोस्टमार्टम रिपोर्टमधून दर्शना पवार हिची हत्याच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आलेली आहेत. या घटनेमुळे राजगड परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -